उरण तालुक्यातील चिर्ले गावात पनवेल न्हावाशेवा रस्त्याच्याकडेला डोंगराचे दगड फोडण्याचे काम सुरु असताना दरड कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून या बाबत उरण पोलीस ठाण्यात ठेकेदार व मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिर्ले येथे पनवेल न्हावा शेवा रस्त्यावर असलेल्या क्वारीवर डोंगराचे दगड फोडण्याचे काम सुरु होते. हे दगड फोडून डंपरमध्ये भरण्याचे काम सुरु असताना अचानक दरड कोसळली. यात पोकलेन मशीनवर काम करणाऱ्या दोन कामगारांचा मृत्यू झाला. इस्माईल अन्सारी (वय २२) आणि इस्तेखार अन्सारी (वय २०) अशी या मृतांची नावे आहेत. सादिक मिया यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून ठेकेदार व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two workers died in landslide at uran contractor booked