उरण : महाराष्ट्रात दोन वर्षात ३५ हजार उद्योजग निर्माण झाल्याचा दावा शनिवारी उलवे नोड मधील महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमात बोलतांना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  केला.एमआयडीसीने महाराष्ट्राच्या उद्योगा विभागाने विविध योजना,महत्वकांक्षी निर्णय,नवनवीन प्रकल्प,विदेशी गुंतवणूक या माध्यमातून कोकण विभागीय महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. बा. पाटील भूमिपुत्र भवन,उलवे नोड येथे आयोजित करण्यात आला होता. एमआयडीसी ने ३०० औद्योगिक क्षेत्र अडीच लाख एकर क्षेत्रावर उद्योग प्रस्तावित आहे.

हेही वाचा >>> वकिलांना लवकरच विद्यावेतन मिळणार,उपमुख्यमंत्री फडणवीस

शासन आणि उद्योग यांच्यातील दुवा २५०० एम एल डी पाणी पुरवठा केला जातो. विदेशी गुंतवणूकदार यांना आकर्षित करण्यासाठी पर्यावरण पूरक उद्योग उभारण्यात येत आहेत. १० सेझ, वाईन पार्क असे अनेक उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहेत. यावेळी कोकणातील महाराष्ट्राची उद्योग भरारी उद्योग गुजरात ही टीका कायम केली जाते. देशाच्या इतिहासात पहिला व्हाईट पेपर काढला केलेल्या विकास कामातून उत्तर देत आहे. दोन वर्षात ३५ हजार उद्योजग निर्माण झाले. उद्योग नगरी गडचिरोली बनविणार राज्यातून उद्योग गेले नाहीत तर आले. आय टी पॉलिसी सुरू केली. दाओस मध्ये ४ लाख कोटींचे करार केले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीत अफगाणिस्तानमार्गे चिनी लसूण?

महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि राहणार असल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांनी उद्योग निर्मितीत भरारी महत्वाची राष्ट्रीयीकृत बँका लहान उद्योगांना सहकार्य करीत नाहीत. भूमिपुत्रांना उद्योग उभारणीसाठी सहकार्य करावे कार्यक्षेच्या पलीकडे एमआयडीसी काम करीत आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.  माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई विमानतळात भूमिपुत्रांना प्राधान्य  द्या त्यांचा विसर पडू देऊ नये,ग्रामपंचायतीना कर देण्यात यावा. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु आदीजण उपस्थित होते.