विमानउड्डाणातील एक अडथळा दूर करणार

प्रस्तावित नवी मुंबई विमानतळावरील विमानांच्या उड्डाणाला अडथळा ठरू पाहणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी उत्तरांचलमधील केंद्रीय शासकीय यंत्रणा मार्गदर्शन करणार आहे. यासाठी या संस्थेचे एक पथक नवी मुंबईत आले आहे. मध्यंतरी जीव्हीकेच्या कामाला वरचा ओवळा गावातील ग्रामस्थांनी विरोध केला होता, मात्र सिडको संपादित जमिनीवर काम करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.

CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Development of e office system started in Collectorate to make administrative work dynamic and paperless
सरकारी काम? फक्त एक क्लिक थांब!… फायलींचा प्रवास होणार सोपा
Facilities at railway station for relaxation of followers of dr babasaheb ambedkar
अनुयायांच्या विश्रांतीसाठी रेल्वे स्थानकात सुविधा, एकाचवेळी १० हजार अनुयायी थांबण्याची व्यवस्था
Insurance, dengue, maleria, Insurance policy,
डेंग्यू, हिवतापासाठी आता ५९ रुपयांत विमा! देशातील सर्वांत मोठ्या वित्ततंत्रज्ञान कंपनीची योजना
Mira-Bhayander continues to wait for abundant water
मीरा-भाईंदरची मुबलक पाण्याची प्रतीक्षा कायम
OTT Release This Week
OTT Release This Week: डिसेंबरच्या पहिल्या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा यादी
EVMs at 25 booths will be verified due to Rahul Kalates doubts about EVMs
राहुल कलाटेंची ईव्हीएमबाबत शंका; २५ बूथवरील ईव्हीएमची होणार पडताळणी!

धावपट्टी आणि इतर कामांची निविदा ‘जीव्हीके’ला प्राप्त झाली आहे. त्यावर विमानतळ सुकाणू समिती व मंत्रिमंडळाची मोहर उमटणे शिल्लक आहे. याच काळात सिडकोला विमानतळपूर्व कामे करून देण्याची आवश्यकता आहे. दोन हजार हेक्टर जमिनीवर भराव, सपाटीकरण, उलवा टेकडी कपात आणि उच्च दाबाच्या वीजवाहिन्याचे स्थलांतर अशी दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे चार कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. यातील गायत्री इन्फ्रा, ठाकूर इन्फ्रा, जे. एम. म्हात्रे इन्फ्रा या बांधकाम कंपन्यांनी कामांना मागील महिन्यात सुरुवात केली होती. जीव्हीके इन्फ्राच्या कामांना मात्र उलवा व कोल्ही येथील ग्रामस्थांनी विरोध केला होता. जीव्हीके कंपनी सिडको संपादित जमिनीवर काम करण्यास मोकळी असल्याने त्यांना प्रकल्पग्रस्तांनी विरोध करू नये, अशी भूमिका सिडकोने घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्यास पोलीस बळाचा वापर केला जाईल, असा इशारा सिडकोने दिल्याने जीव्हीकेच्या कामालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे चारही बांधकाम कंत्राटदारांच्या कामाला आता वेग आला आहे.

उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे महत्त्वपूर्ण काम शनिवारपासून सुरू करण्यात येणार असून उत्तरांचलमधील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अ‍ॅन्ड फ्युएल रिसर्च संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही टेकडी छाटली जाणार आहे. या संस्थेच्या सूचनेवरून पहिले काही दिवस प्रायोगिक तत्त्वावर काम केले जाणार आहे. काही ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता सिडकोने प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीबरोबर नुकत्याच दोन बैठका घेऊन सिडकोच्या जमिनीवरील कामाला प्रकल्पग्रस्तांनी विरोध करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गावठाणातील कामे वगळता सिडकोने विमानतळपूर्व कामांना सुरुवात करावी, अशी सहमती या समितीतील काही प्रमुख नेत्यांनी दर्शवल्याने तरुण प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम

प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत विमानतळ कामांना विरोध कायम ठेवण्याची भूमिका विस्थापित गावातील काही तरुणांनी ठेवली आहे. त्यामुळे समितीतील जुन्या नेत्यांबरोबर या तरुण कार्यकर्त्यांची सिडकोत बैठकीदरम्यान तू तू मै मै झाली. सिडकोने पुनर्वसन पॅकेजमधील भूखंडांचा प्रत्यक्षात ताबा द्यावा आणि विकासशुल्क ग्रामस्थांच्या स्वाधीन करावे, अशा दोन मागण्या आहेत. त्यामुळे संघर्ष समितीत तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क असा एक नवीन सामना रंगला आहे.

विमानतळपूर्व कामाला आता वेगाने सुरुवात झाली आहे. सिडकोच्या जमिनीवर सुरू असलेल्या कामांना तरी प्रकल्पग्रस्तांनी विरोध करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कामात अडथळे आणणाऱ्यांशी यानंतर पोलीस चर्चा करणार आहेत. परवापासून उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे.

भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Story img Loader