नवी मुंबई : शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या असताना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या परिसरातही आता अनधिकृत बांधकामांचा शिरकाव झाल्याचे चित्र आहे. याबाबत नवी मुंबई महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना या अनधिकृत बांधकामांबाबत लेखी माहिती कळवली आहे. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. आ. गणेश नाईक यांनीही याबाबत योग्य ती तपासणी करून कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील चौक गावाजवळ माथेरानच्या पायथ्याशी बांधलेले मोरबे धरण हे नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे आहे. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. धरणाच्या पाण्याची कमाल उंची ८८ मीटर असून धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही १९०.८९ दशलक्ष घनमीटर आहे.

abhyudaya nagar residents to get 635 sq ft home in redevelopment
रहिवाशांना ६३५ चौरस फुटांचे घर; अभ्युदयनगर वसाहत पुनर्विकास; बांधकामासाठी आज निविदा
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
bmc
रस्ते विकासानंतर चर, खोदकामास परवानगी नाही; मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे सक्त निर्देश
hybrid energy project combining floating solar and hydroelectric power will start in Central Vaitrana
मध्य वैतरणा धरणाच्या क्षेत्रात २६.५ मेगावॉट संकरित वीजनिर्मिती
Bhira, Navi Mumbai corporation, Bhira project,
नवी मुंबई : भिरा प्रकल्पाच्या पाण्यावर पालिकेचा दावा
CIDCO Controller and Unauthorized Constructions Department strong action against illegal constructions in Navi Mumbai and Panvel
नवी मुंबई : सिडकोकडून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई
park created through afforestation in Marol will open for citizens soon
साडेतीन एकरांत शहरी जंगल! मरोळमध्ये वनीकरणातून साकारलेले उद्यान नागरिकांसाठी लवकरच खुले
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ

हे ही वाचा…खारघरमधील स्वप्नपूर्ती संकुलात अपुरा पाणीपुरवठा

आता महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाभोवतीही अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाला सुरवात झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने या धरणाच्या बफर झोनमध्येच असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांना पत्राद्वारे कळवले आहे. बेकायदा बांधकामाबाबत कडक कारवाई करण्याची मागणी आ. गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. मोरबे धरणाच्या बफर झोनमध्ये कोयना, बोरगाव नंबर १,२ अशी गावे असून पालिकेने या भागातील सर्वेक्षण केले आहे. धरणातील पाणीसाठ्याचा फुगवटा ज्या गावांच्या परिसरात जातो, त्या ठिकाणी अनधिकृत बंगल्याचे काम तसेच भराव केला असल्याचे चित्र आहे.

मोरबे परिसरातील चुकीच्या कामाची माहिती घेऊन पालिकेने ठोस कारवाई करावी. तेथील पाण्यात कोणतेही सांडपाणी किंवा इतर पाणी जाऊ नये याबाबत महापालिका आयुक्तांनी सतर्क राहून ठोस कारवाई करावी.- गणेश नाईक, आमदार, ऐरोली

हे ही वाचा…मुख्यमंत्र्यांसमोर नाईक विरोधाचा पाढा

मोरबे धरणातील बफर झोनमधील अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण, नमुंमपा