नवी मुंबई: अनधिकृत फेरुवाल्यांनी कारवाई करणाऱ्यांवरच दादागिरी केली. त्यांच्याशी झटपटही केली. याचे मोबाईल चित्रण सध्या व्हायरल होत असून अनधिकृत फेरीवाल्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना उच्छाद मांडला आहे. मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकालाही ते जुमानत नसून त्यांच्याशी अरेरावीने बोलत दादागिरी करण्याचे प्रकार वाढत आहेत. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रात येतो. तुर्भे विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात विशेष मोहीम उघडली आहे. त्याच अनुषंगाने कारवाई करत असताना अनधिकृत पणे सफरचंद विकणाऱ्या फेरीवल्या महिलेवर कारवाई करण्यास सुरू केल्यावर त्या महिलेने व आसपास असलेल्या अन्य अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण विरोधी पथकातील सुरक्षा रक्षकला घेरून ठेवले. ज्यांनी घेरून ठेवले त्यात महिलांचा समावेश असल्याने अन्य सुरक्षा रक्षकांना  सहकार्याला सोडवताना नाकी नऊ येत होते. शेवटी एका महिला सुरक्षा रक्षकाच्या मदतीने त्याला सोडवण्यात आले.

हेही वाचा… नवी मुंबई: इमारतीचे तोडकाम सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

दरम्यान टोपलीतील सर्व सफरचंद रस्त्यावर पडले. हा घडलेला सर्व प्रकारचे  मोबाईल चित्रण व्हायरल होत आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांनी सांगितले की अनधिकृत फेरीवल्यावर कारवाई करताना असे प्रसंग येत आहेत. मंगळवारी घडलेल्या घटने बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. असे कितीही प्रकार झाले तरी कारवाई थांबणार नाही असेही धांडे यांनी स्पष्ट केले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized hawkers bullied those who took action against navi mumbai municipal anti encroachment team dvr
Show comments