रुग्णालय किंवा त्याच्या तीन मीटर अंतरावर मोबाइल टॉवरला बंदी असताना वाशीतील एका लहान मुलांच्या रुग्णालयावर पालिकेची परवानगी न घेता बेकायदा मोबाइल टॉवर उभारण्यात आला आहे. यामुळे पालिकेचे दुर्लक्ष याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील विविध विभागांतील बेकायदा मोबाइल टॉवर कारवाईकडे पाठ फिरवल्याने शहरात दिवसेंदिवस बेकायदा मोबइल टॉवरची संख्या वाढत आहे. शहरातील गावठाण, झोपडपट्टी भागात देखील मोबाइल टॉवर उभारल्याचे दिसत आहे. वाशीतील लहान मुलांच्या येवले रुग्णालयावर देखील बेकायदा मोबाइल टॉवर उभारला आहे. पालिकेने परवानगी दिली नसल्याची माहिती नगररचना विभागाने दिली.

वाशी से.१० येथे हे रुग्णालय असून लहान मुलांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल येथे आणि त्यांच्या ३ मीटर अंतरापर्यंत मोबाइल टॉवर बसविण्यास सक्त मनाई आहे. असे असताना हा टॉवर उभारण्यात आला आहे.  महापालिकेने १ डिसेंबर २०१३ मध्ये एकूण ४२९ मोबाइल टॉवर उभरण्याची परवानगी दिली होती. त्याचबरोबर १ जानेवारी २०१४ मध्ये ते आतापर्यंत १२५ टॉवरला परवानगी दिलेली आहे.

नगररचना विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले की, सन २०१६ पासून आजतागायत अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करण्याचे अधिकार पालिकेला आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unauthorized mobile tower on the hospital despite the ban