नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकाक्षेत्रातील ५ इंग्रजी शाळा अनधिकृत असल्याची यादी नवी मुंबई महापालिकेने जाहीर केली असून त्यात अनधिकृत असलेल्या सीवूड्समधील द ऑर्चिड शाळेने  नजिकच असलेले मैदानही ताब्यात घेऊन ते कुलुपबंद करुन टाकले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत शाळांबाबत पालिका फक्त यादी जाहीर करण्यापुरतीच आहे का ?असा सवाल उपस्थित झाला असून या अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करुन तात्काळ शाळा बंद करण्याची कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात येत आहे.

नवी मुंबई महपालिकेच्या वतीने  शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून यंदा नवी मुंबई शहरात ५ अनधिकृत असून विशेष म्हणजे या पाचही शाळा  इंग्रजी माध्यमाच्याच आहेत. शिक्षणक्षेत्रात सध्या इंग्रजी , सीबीएसई ,आयसीएसई शाळांचे पेव वाढत असून पालकही आपल्या मुलांना या शाळांमध्ये घालण्याचा हट्ट करत असताना त्या शाळा अधिकृत आहेत का याची खबरदारी पालकांनीही घेणे गरजेचे असून दुसरीकडे अनधिकृत शाळांवर पालिकेने तात्काळ कारवाई करुन पालकांची फसवणूक थांबवली पाहीजे. 

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

हेही वाचा >>> नवी मुंबई : कांदळवनावरील सीसीटीव्ही यंत्रणा निविदा प्रक्रियेत; सीसीटीव्हीच्या कामाला ८ महिन्यांनी सुरुवात

बेलापूर येथील इस्माइल एज्युकेशन ट्रस्टची अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टची नेरुळ मधील इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, द आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे द ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल  सीवूडस, सेक्टर-४०, ज्ञानदिप शिक्षण प्रसारक मंडळ, किसननगर नं. ३, ठाणेचे सरस्वती विद्यानिकेतन स्कुल, सेक्टर -५, घणसोली (न्यायप्रविष्ठ प्रकरण), इलिम फुल गोस्पेल ट्रस्टचे  इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाळे या शाळा अनधिकृत आहेत. या शाळांमध्ये संंस्थांच्या माध्यमातून अनधिकृत काम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. सीवूड्स सेक्टर ४० येथील द ऑर्चिड शाळा अनधिकृत असून संस्थेला दिलेल्या मैदानााचा ताबा या संस्थेने घेतला  आहे. या मैदानावर कॉंक्रीटीकरण करुन  फुटबॉल टर्फ व इतर खेळाचे साहित्य बसवले आहे.  मैदाने ही शाळेच्या वेळा व्यतिरिक्त सर्वसामान्यांसाठी खुली ठेवणे बंधनकारक असताना दुसरीकडे सिडको , पालिका दुर्लक्ष करते. त्यामुळे पालकांबरोबरच या शासकीय आस्थापनाही जबाबदार असून फक्त शाळा अनधिकृत जाहीर करण्याबरोबरच ती शाळा तात्काळ बंद करण्याची जबाबदारी असताना अनेक वर्ष पालकांची मुलांची फलवणूक होत असल्याचे चित्र आहे. शहरातील अशा अनधिकृत शाळांमध्ये शाळेच्या परवानगीसाठी आम्ही अर्ज केला आहे. आम्हाला परवानगी मिळणार आहे असे सांगून प्रवेश दिले जातात .परंतू पुढे जाून याच शाळांना परवानगी नसल्याने मुलांना अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी पालिकेने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.परंतू पालिका ठाणे जिल्हा परिषदेकडे कारवाईसाठी बोट दाखवते.तर ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी पालिकेकडे बोट दाखवतात.  नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाला याबाबत विचारणा केली असता अनधिकृत शाळांवर जिल्हा परिषदेने कारवाई केली पाहीजे असे सांगीतले.

संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करा….

पालिका हद्दीतील  अनधिकृत शाळा निर्माण होतेच कशी काही शाळांच्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहीतोपर्यंत पालिका ,सिडको, जिल्हा परिषद काय करते. त्यामुळे संबंधित संस्था व संस्थाचालकांवर आरटीई अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले पाहीजेत. तसेच शाळा परवानगीबाबत अडचणी असतील तर कालबाध्द पध्दतीने नियोजन करुन परवानगी दिली पाहीजे.अन्यथा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊन शाळांची मनमानी व मुजोरी वाढेल.

सुधीर दाणी, प्रवर्तक अलर्ट सिटीझन्स फोरम

ज्या महापालिकांच्या हद्दीत अनधिकृत शाळा आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे व आरटीई अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे अधिकार स्थानिक आस्थापनांना आहेत.याबाबतचे पत्र पालिकेला दिले आहे. त्यामुळे पालिकांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

डॉ.भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी ठाणे जिल्हा परिषद

शाळा अनधिकृत तरी खेळाचे मैदान कुलूपबंद …

सीवूड्स सेक्टर ४० येथील द ऑर्चिड शाळा व संस्थेला मान्यता नसताना शाळा सुरुच कशी झाली व याच शाळेने अनधिकृतपणे मैदान ताब्यात घेऊन मैदानावर फुटबॉल टर्फ बांधून मैदान कुलूपबंद केलेच कसे असा प्रश्न असून पालिका व सिडको झोपेचे सोंग घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोणाच्या वरदहस्ताने हे सर्व झाले असा प्रश्न निर्माण झाला आहे.