पनवेल : महापालिका क्षेत्रातील खिडुकपाडा या गावामध्ये राहणाऱ्या एका नराधम काकाने आपल्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून पोलीसांनी या नराधम काकाला अटक केली आहे. हा नराधम काका पुतणीवर बालवयापासून लैंगिक अत्याचार करीत होता. काही महिन्यांपूर्वी पिडीतेचा विवाह झाला त्यानंतर या काकाने तीच्या पतीला तिचे व त्याचे जुनी छायाचित्रे पाठवल्याने पतीने त्या पिडीतेला सोडून दिले. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.   

हेही वाचा >>> उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव

खिडुकपाडा गावात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर येथील ग्रामस्थ हादरले आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत पिडीतेने दिलेल्या तक्रारीमध्ये पिडीतेला मागील ८ वर्षांपासून ३५ वर्षीय आदेश वसंत उलवेकर याने बालिका असल्याचा फायदा उचलून तीला पेयामध्ये गुंगीचे पदार्थ पाजून तीच्यावर अत्याचार केला. नात्याने काका असल्याने पिडीता त्यांच्या घराजवळच राहत होती. खिडुकपाडा गावातील काकाच्या घरी अनेकदा तसेच उसाटणे येथील साईकिरण आणि खारघर येथील ऑरेंज लॉजवर वारंवार घेऊन जाऊन तीचे लैंगिक शोषण केले. पिडीतेचे नग्न अवस्थेमधील छायाचित्र या नराधम काकाने काढली होती. आदेश व पिडीतेची छायाचित्र त्याने तीच्या पतीला पाठविल्यानंतर पिडीतेला तीच्या पतीने घरी पाठविले. सध्या पिडीता १८.६ वर्षांची आहे. या घटनेची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे केल्यानंतर तातडीने याबाबत बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री आदेशला अटक करण्यात आली.