उरण : उरणमधील जासई परिसरात असलेल्या डुंबा भागात राहणाऱ्या एका ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मामानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी उरण पोलिसात महेश भीमा भिडे (१८) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा तरुण नवी मुंबईतील डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचार घेत असल्याने उरण पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

उरण-पनवेल महामार्गालगत जासई हद्दीत डुंबा परिसर आहे. या भागात हे कुटुंब वास्तव्य करीत आहे. नात्याने मामा असल्याने या तरुणाचे मुलीच्या घरी जाणे-येणे होते. याचाच फायदा घेत मुलीला एकटी पाहून तिच्यावर या तरुणाने लैंगिक अत्याचार केला. तसेच याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने मुलीला दिली होती. मात्र मुलीने घडलेल्या घटनेची हकीकत आपल्या आईला सांगितल्यानंतर तिने तातडीने जासई पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या प्रकरणाची उरण पोलीस ठाण्याचे अतुल अहिरे हे अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ माजली आह

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uncle sexual abuse of niece