उरण : डहाणू येथील वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम बंदर म्हणून गणले जाणार असल्याचे मत केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले आहे. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत जेएनपीए बंदराच्या प्रशासन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राज्याचे बंदर विभागाचे सचिव संजय सेठी व जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ हेही उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. वाढवण बंदर केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे.

या बंदराच्या परिसरात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीए कडून व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहेत त्याचे तसेच जेएनपीए बंदर परिसरात सुशोभीकरण करण्यात आलेल्या सरोवरांचे सोनेवाल यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यामध्ये या सरोवरांचे महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर,तुकाराम व एकनाथ महाराज यांची नावे देण्यात आली आहेत. यावेळी त्यांनी बंदरातील पायाभूत सुविधा  आणि विकास प्रकल्पाचा आढावा घेतला. तर बंदरावर आधारित सेझ प्रकल्पातील शिस्तबद्ध वाहने हाताळणी,वाहनांची सुकर व गतीने येजा ऊर्जा व्यवस्थापण, व्यवहार आदी सुविधांच्या  स्मार्ट सेझ प्रणालीचेही भूमीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे सेझ मधील भूखंड धारकांचे सामंजस्य करार ही करण्यात आले. तर नव्याने उभारण्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील वाढवण बंदर परिसरातीलस्थानिक तरुणांना विविध प्रकारच्या रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याची नोंद करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अँप चे उदघाटन ही सोनोवाल यांच्याहस्ते करण्यात आले. जेएनपीए कडून वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. वाढवण बंदर हे देशातील सर्वोत्तम बंदर बनणार,किनारपट्टी वरील नागरिक व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. तसेच सागरमाला अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यात मेरिटाईम २०३० या वर्षात हे लक्ष पूर्ण करणार आहे.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Tiger death , Kohka-Bhanpur route, tiger gondia ,
राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र! कॉरिडॉरमध्ये वाघाचा मृत्यू
Video About Vadhvan Port
Vadhvan Port : वाढवण बंदर का महत्त्वाचं आहे? पाच वैशिष्ट्ये कुठली? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण
avian flu transmission to humans
विश्लेषण : ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) माणसांसह वाघांनाही धोकादायक? 
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

हेही वाचा >>>पुनर्विकासातील घोळांना चाप; इमारत धोकादायक प्रमाणपत्र सादर करण्याचे उपनिबंधकांचे आदेश

वाढवण  बंदरात इको सिस्टीम तयार होणार आहे. या बंदरात दहा लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. याचा किनारपट्टी वरील रहिवाशांना लाभ होणार असून या बंदराची उभारणी निश्चित कालावधीत काम पूर्ण होणार आहे. तर कमीत कमी वेळात जेएनपीए बंदरातून एक कोटी कंटेनरची हाताळणी केली जाणार आहे. जेएनपीए हरित बंदर होणार आहे. तसेच इको बंदर म्हणून तयार केला जात आहे. तसेच १६ हरित ठिकाणे तयार करणार असल्याची माहिती बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली.३० ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होण्याची शक्यता : वाढवण बंदराचे ३० ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन होण्याची शक्यता जेएनपीएच्या प्रवक्त्यानी व्यक्त केली आहे.

Story img Loader