पनवेल: पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पनवेल पालिका प्रशासनाने पोलीसांच्या मागणीनंतर ३० वार्डन देण्याची तयारी दर्शविली आहे. वार्डन मिळेपर्यंत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेऊन सतत कोंडी होणा-या ठिकाणी पोलीसांचे नंबर असलेले फलक झळकवले आहेत. या अनोख्या शक्कलीमुळे जागरुक नागरिक पोलीसांना कोंडीनंतर कळवतील आणि पोलीस येऊन कोंडीतील वाहनांचे नियमन करतील अशी अपेक्षा आहे. मात्र कोंडीच्या ठिकाणी किती वेळात पोहचतील याविषयी सामान्यांमध्ये साशंकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल शहरातील कापडगल्ली, जुन्या तहसिलदार कचेरीसमोरील मार्ग, जुन्या पोस्ट कार्यालयासमोरील मार्ग, वि. खं. शाळेजवळ, टपाल नाका याठिकाणी वाहतूक कोंडी असते. पनवेल शहर वाहतूक पोलीस ठाण्यात सध्या अधिकारी व कर्मचारी असे ४३ जण कार्यरत आहेत. त्यातील १० पेक्षा अधिक कर्मचारी हे प्रशिक्षण, बंदोबस्त आणि आजारपणाची सुट्टी व इतर कारणास्तव प्रत्यक्षात कामावर नसतात. रात्रपाळीला चार कर्मचारी नेमल्यामुळे प्रत्यक्षात २५ ते ३० जणांवर शहराची वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी येते.

हेही वाचा… खारघर वसाहतीमधील काही भागात पाणी समस्येने रहिवाशी हैराण

पनवेल शहरासह राष्ट्रीय व राज्य महामार्ग या परिसरात असल्याने अपघात व टोईंगव्हॅनवरील काम अशी सर्वच कामे नित्याची आहेत. यासह पनवेल शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसिल कचेरी, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुरवठा विभाग तसेच विविध सरकारी कार्यालय शहरात असल्याने येथे तालुक्यातून येणारा मोठा शेतकरी वर्ग आहे. यातील शेकडोजण मोटार व दुचाकीने येत असल्याने वाहतूक कोंडी पनवेलकरांसाठी नित्याची झाली आहे. सरकारी सुट्टीच्या दिवशी सणासुदीचा काळ नसल्यास ही कोंडी कमी झालेली दिसते. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी कोंडी झाल्यास स्थानिक पोलीसांचे नंबर (८६८९९९४२४२, ८७८८१२५९९१) असलेला फलक वाहतूक कोंडी होणा-या अनेक चौकात लावले आहेत.

हेही वाचा… मोरा – मुंबई जलप्रवासासाठी प्रवाशांना पार करावी लागते अडथळ्यांची शर्यत

नवी मुंबईत कोठेही नागरिकांना पोलीसांसोबत संपर्कासाठी ११२ हा हेल्पलाईन संपर्क देण्यात आला आहे. पनवेल शहरात होणा-या वाहतूक कोंडीसाठी काही जागरुक नागरिक पुढाकार घेत आहेत. पनवेल शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि उत्सव काळात वार्डन मिळाल्यास वाहतूक विभागाला सहाय्य होईल. हे वार्डन पोलीसांच्या वाहतूक नियमनात प्रबोधनाचे काम करतील. कायमचे पनवेल शहर कोंडीमुक्त करण्यासाठी मनुष्यबळातून प्रबोधन, तंत्रज्ञ आणि रोड इंजिनीयरींग अशा संयुक्तिक कार्यवाही होणे गरजेचे आहे. वाहनचालकांना स्वयंशिस्तीसाठी प्रबोधन आणि प्रबोधनानंतर सुद्धा ऐकत नसल्यास कार्यवाहीचे सातत्य यातून हा प्रश्न सुटू शकेल. – तिरुपती काकडे, उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक विभाग