लोकसत्ता टीम
पनवेल : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणि दुकानाची जाहिरात होण्यासाठी पनवेलमधील एका साडी विक्रेत्या व्यापाऱ्याने अनोखी शक्कल लढविली आहे. १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रात मतदान होणार आहे. मतदान करुन पनवेल शहरताली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याशेजारी दुकानात मतदान करुन थेट दुकानात येणाऱ्या पहिल्या ५१ स्त्रियांसाठी ही योजना दुकानदाराने जाहीर केली आहे. महिला मतदारांसह १३ मे रोजी मतदान करुन येणाऱ्या पहिल्या ५१ पुरुष मतदारांसाठी या दुकानदाराने सियाराम कंपनीचे शर्ट व पॅन्टपीस देणार असल्याची जाहीर केले आहे.
शहरातील द्वारकादास शामकुमार या दुकानाचे चालक शरद पाटील यांनी ही जाहीरात समाजमाध्यमांवर ही जाहिरात केली आहे. याबाबत दुकानचालक शरद पाटील यांना विचारले असता त्यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ही योजना सामान्य मतदारांसाठी जाहीर केली असल्याचे सांगितले. मतदान करुन थेट मतदारांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी १३ मे रोजी (सोमवारी) दुकान सकाळी सात वाजल्यापासून सुरु ठेवले असून महिला व पुरुष मतदारांसाठी खास कुपनची सोय केल्याचे दुकानचालक पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा-पनवेल : ४ हजार मतदारांपैकी ५२ मतदारांनी घरुन मतदानाचा हक्क बजावला
सकाळी मतदान करुन आल्यावर मतदान केल्याची निशाणी दाखविल्यावर या कुपनच्या साह्याने पैठणी व शर्ट-पॅण्ट पीस मिळविता येईल. मागील सहा वर्षांपासून पनवेल शहरात द्वारकादास शामकुमार या नावाने हे दुकान शहराच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याशेजारी आहे. अधिक माहितीसाठी मतदारांना 9049777544, 8104207793 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.