उरण : गुरुवारी सकाळी ८ वाजता अचानक आलेल्या अवेळी पावसाच्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण केला. या सरी अवघ्या दोन मिनिटे बरसल्या. यामुळे नागरीकांना पावसापासून वाचण्यासाठी आडोसा शोधण्याची घाई झाली होती. मागील अनेक दिवसांपासून पावसाचे वातावरण निर्माण होत असले तरी पाऊस येत नव्हता, गुरुवारी मात्र तो आला आणि त्याने सकाळी उरणच्या नागरिकांची तारांबळ उडवली.
अनेक दिवसांपासून विजांचा गडगडाट होत आहे. आभाळ झाकले जात होते. पाऊस येण्याची अनेक चिन्हे निर्माण होऊन उरणमध्ये पाऊस झाला नव्हता. या पावसामुळे उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : कलिंगडची मागणी वाढल्याने दरवाढ
शेतकरी हवालदिल
हेही वाचा – नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिकाची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या
पावसाचे अवेळी आगमन व वातावरणात सातत्याने होणारे बदल याचा फटका येथील आंबा यासह शेतकऱ्यांच्या अनेक पिकांना बसला आहे. परिणामी हाता तोंडाशी आलेली पिके व फळे नष्ट होण्याची वेळ आली आहे.