लोकसत्ता, प्रतिनिधी

नवी मुंबई: २१ व्या शतकातील शहर म्हणून निर्मिती झालेल्या नवी मुंबई शहरातील नवी मुंबई महापालिकेची अद्ययावत अशी संगणक प्रणाली प्रत्यक्षात येणार असल्याचे वृत्त लोकसत्ताने दिले होते. या कामाचा कार्यादेश नुकताच दिला आहे. पालिकेच्या नव्या अद्ययावत संगणकप्रणालीच्या कामासाठी २३ कोटी ५१ लाख ९० हजार ५२० रुपये खर्च येणार आहे. ९ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला असून ९ महिन्यात म्हणजेच २१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
third party organizations will do scrap disposal appointment of three organizations after tender process
त्रयस्थ संस्थांकडे भंगार विल्हेवाट, निविदा प्रक्रियेअंती तीन संस्थांची नियुक्ती
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन

नव्या संगणकीय प्रणालीत नागरीकांच्यादृष्टीने पालिकेच्या विविध सुविधा अद्ययावतपणे उपलब्ध होणार आहेत.त्यामुळे घरबसल्या आपल्या फोनद्वारेही पालिकेची विविध बिले भरण्याच्या सुविधेसह पालिकेची संगणकीय प्रणालीच अद्ययावत होणार आहे नागरीकांना दिल्या जाणाऱ्या नागरी सुविधा, पाणीबिले, मालमत्ता कर बिले यासाठीही मोबाईल अप्लीकेशनसह अनेक अद्ययावत सुविधा प्राप्त होणार आहेत. यामध्ये जवळजवळ २० अप्लीकेशनन्स असणार असून या नव्या संगणकीय व अद्ययावत प्रणालीमुळे नागरीकांना वेगवान कार्यवाही करता येणार आहे. या नव्या बदलाद्वारे मालमत्ता कर मेनेजमेंट सिस्टम, पाणी बिल, जीस मॉडेल, इस्टेट मॅनेजमेंट, विविध वर्कशॉप मॅनेजनेंट, नागरीकांना घरबसल्या सुविधा देणारे मोबाईल ऑनलाईन अप्लीकेशन, एचआर आणी पे रोल सिस्टम, महापालिका कर्मचारी पेन्शन व इतर सुविधा, महापालिकेच्या सचिव विभागाशी संबंधित अजेंडा, मालमत्ताबाबत अद्ययावत माहिती, देखभाल दुरुस्ती, घनकचरा व्यवस्थापन ,यांत्रिक साफसफाई, पालिकेच्या नागरी सुविधा केंद्राद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा विविध दाखले, परवानगी तसेच तक्रार निवारण प्रणाली या सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर नागरीकांना पालिकेशी ऑनलाईन सुविधेद्वारे विविध प्रकारचे अर्ज तसेच माहिती अधिकारीखाली हवी असलेली माहिती त्यासंबंधी अर्ज या सुविधाही या अद्यावत प्रणालीद्वारे मिळणार आहेत.त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेचा एकंदरीत खर्च उत्पन्न, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनबाबत अद्ययावत माहिती ,कर्मचारी अद्ययावत प्रणाली उपलब्ध होणार असून पालिकेची एकंदरीत माहिती क्लाउडवर ठेलली जाणार आहे.

आणखी वाचा-पनवेल पालिका क्षेत्रातील गणेशोत्सवातील मंडपासाठी ऑनलाईन अर्ज करावेत

नवी मुंबई महापालिकेचे संगणकीय कामासाठी एंकदरीत २६ कोटी ७० लाख ४५०० रुपयाची निविदा प्राप्त झाली होती.परंतू ११.९२ टक्के कमी दराने म्हणजेच २३ कोटी ५१ लाख, ९० हजार ५२० रुपये एवढा या कामाचा खर्च असून ९ महिन्याचे प्रमुख काम तसेच ५ वर्ष देखभाल दुरु्स्तीचे काम करण्यात येणार आहे. मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया या कंपनीला ठेका मिळाला असून पुढील वर्षात पालिकेची नवीन संगणकीय प्रणाली विकसित केली जाणार आहे.

पालिकेची संगणकीय प्रणाली कात टाकणार असून नव्याने होणाऱ्या संगणकीय प्रणालीत नागरीकांसाठीची अनेक कामे सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. पालिकेशी संबंधित कामे वेगवानपणे करता येणार असून त्यात अंध व्यक्तिंनाही या प्रणालीचा वापर करता यावा. या पध्दतीने सुविधा निर्माण केली जाणार आहे. नवी मुंबई महापालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सोयी सुविधा तसेच विविध प्रकारची बिले तसेच अनेक दाखले याबाबत संपूर्णअद्ययावत संगणकीय प्रणाली निर्माण केली जाणार आहे. यामुळे नागरीकांना आधुनिक पध्दतीने वेगवान कार्यवाही व सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

नवी महापालिकेची अद्ययावत संगणकीय कार्यप्रणाली करण्यात येत असून पालिका प्रशासन व नागरीक यांना चांगल्या सुविधा निर्माण होणार असून वेगवान कार्यवाही केली जाणार आहे. पालिकेशी संबंधित व्यवहार सुलभतेने करता येणार आहेत. -शिरीष आरदवाड, सहशहर अभियंता

Story img Loader