उरण : मंगळवारी पुन्हा एकदा उरणच्या हवा प्रदूषणात वाढ होऊन एअर क्वालिटी इंडेक्स (ए.क्यू.आय.) ३४८ वर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात १९६ वर असलेल्या मात्रेची ३४८ वर नोंद झाली आहे. उरण हे देशातील सर्वात प्रदूषित शहराच्या रांगेत पहिल्या स्थानावर आहे.
हेही वाचा – सिंगापूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक, दोघांचा शोध…
हेही वाचा – नवी मुंबई : घटना जूनमधील गुन्हा दाखल ऑक्टोबरमध्ये, पीडित व्यक्तीचे दोन हात गेले…
प्रदूषणाची नोंद करणाऱ्या संस्थेने केलेल्या निरीक्षणातून उरण हे मंगळवारी सायंकाळी देशातील हवेतील धुळीकणाच्या कक्षेतील शहरांत पहिल्या क्रमांकावर आला आहे. सप्टेंबर महिन्यातही प्रदूषणात उरणचे स्थान देशात पाहिले होते. वातावरणातील बदलामुळे हवेतील वाढत्या प्रदूषणाचा उरणमधील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तर जागतिक आरोग्य संस्थेने दक्षता घेत येथील नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची सूचना केली आहे. २०२२ पासून प्रदूषण नोंद अधिक असल्याने उरणकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.