उरण : शहरातील वाहतूक कोंडीवर महत्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास) मार्ग येत्या २०२५ मध्ये पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे. यातील नगरपरिषद हद्दीतील जमिनीचे भूसंपादनाचा अथडळाही लवकरच दूर होईल असा विश्वास उरण नगर पालिकेने व्यक्त केला आहे. हा महत्वपूर्ण मार्ग पूर्णत्वास येण्यासाठी २०२५ उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणच्या प्रवासी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे. येथील लोकल, रस्ते मार्ग, जलमार्ग यांनी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरीवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरणच्या सर्व मार्गावर सततच्या कोंडीने प्रवासी, नागरिक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा – “वैदर्भीय मुख्यमंत्री असताना अधिवेशन सहा दिवसांचेच होणे हे वेदनादायी”, विदर्भवाद्यांची खंत

उरण बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव २००१ साली पहिल्या युती सरकारच्या काळात उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराला जोडणाऱ्या उरण – पनवेल या मुख्य मार्गालगत मोरा मार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित होता. त्याचे भूमीपूजनही करण्यात आले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २००८ ला माध्यमातून सिडकोच्या निधीतून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. आता या बाह्यवळण मार्गाचा खर्च ४५ कोटींच्या घरात गेला आहे. या मार्गाचे काम वेगाने व्हावे याकरिता आ. महेश बालदी यांनी पाठपुरावा केला. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जमिनीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. या संदर्भात सिडकोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद नव्हता.

हेही वाचा – निवडणुकांतील कामगिरीचे श्रेणीकरण; भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

उरणच्या बाह्यवळण मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यासाठीचा निधी येत्या दोन महिन्यात उपलब्ध होईल त्यानंतर मार्गाचे काम मार्गी लागेल. – निखिल दोरे, अभियंता, उरण नगर परिषद

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran bypass road is likely to be operational in the new year ssb