उरण : शहरातील वाहतूक कोंडीवर महत्त्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास) मार्गात नगर परिषद हद्दीतील जमिनीच्या भूसंपादनाचा अथडळा निर्माण झाला आहे. यासाठी लागणारा निधीही उपलब्ध नसल्याने हा मार्ग पूर्णत्वास येण्यासाठी २०२५ साल उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरणच्या प्रवासी व नागरिकांना आणखी काही महिने या मार्गाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उरण शहर आणि परिसराचे झपाट्याने नागरीकरण सुरू आहे.

उरण हे लोकल, रस्ते मार्ग, जलमार्ग यांनी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरी वस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे शहरातील वाहनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीत भर पडली आहे. उरणच्या सर्व मार्गांवर सततच्या कोंडीने प्रवासी, नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

उरण बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव २००१ साली पहिल्या युती सरकारच्या काळात उरण शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहराला जोडणाऱ्या उरण – पनवेल या मुख्य मार्गालगत मोरा मार्गाला जोडणारा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित होता. त्याचे भूमिपूजनही करण्यात आले, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २००८ ला उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या माध्यमातून सिडकोच्या निधीतून बाह्यवळण मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

हे ही वाचा…शिंदे गटाच्या शहरप्रमुखाचा पोलिसांसमोर थयथयाट नवरात्रोत्सवाची जागा, कमानी, दिव्यांचे खांब काढण्यावरून वादंग

या मार्गात कांदळवन असल्याने त्यांच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे या मार्गाच्या खर्चात वाढ झाली. आज २७ कोटींच्या घरात या बाह्यवळण मार्गाचा खर्च गेला आहे. या मार्गाचे काम वेगाने व्हावे याकरिता आ. महेश बालदी यांनी पाठपुरावा केला. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जमिनीसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र सध्या सिडकोच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या एलिव्हेटेड मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गाला जोडणाऱ्या उरण नगर परिषद हद्दीतील भूखंडावर घरे आहेत. त्यासाठी पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून येथील जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्यासाठी लागणारा निधी मिळावा याकरिता शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा…नैना’प्रकल्पांचे उद्या भूमिपूजन, पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता

उरणच्या बाह्यवळण मार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या भूखंडावर कुळांची घरे आहेत. यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर या मार्गाचे काम पूर्ण होईल.- समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद