उरण : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या रानसई धरणातून उरण शहर आणि येथील ग्रामपंचायतीना केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस कपात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीने दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरणच्या रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांना डिसेंबर महिन्यापासूनच वर्षोनुवर्षे पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्योगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराना दररोज ४१ दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र एमआयडीसी कडे केवळ ३० दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज १० दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी पाणीकपात केली जात आहे.

हेही वाचा…खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात

दरम्यान, एमआयडीसी कडून पाणी पुरवठा करता यावा साठी सिडकोकडून पाणी घेतले जाते. त्या बदल्यात एमआयडीसी कडून सिडकोला पाणी दिले जाते यात सिडको कडून ३.८ दशलक्ष लीटर पाणी घेतले जात आहे. रानसई धरणाची क्षमता वाढविण्याची मागणी

रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवावी किंवा धरणातील गाळ काढावा या दोन उपाययोजनाची चर्चा गेल्या पंचवीस वर्षांपासून केली जात आहे. यातील धरणाच्या गाळाची पाहणी पुण्यातील एका संस्थे कडून करण्यात आली असून गाळाचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र साठ वर्षात धरणग्रस्तांचे पुनर्वसन केलेले नाही. रानसई धरणाच्या उभारणीसाठी ज्या शेतकरी व आदिवासीच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन आजही झालेले नाही. त्यामुळे नव्याने धरणाची उंची वाढविण्यासाठी लागणारी जमीन संपादित करावी लागणार असली तरी त्यांच्याही पुनवर्सनाचा प्रश्न आहे.आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्याची दखल घेत पाठपुरावा केला नसल्याने पाणीटंचाईची ही समस्या गंभीर होऊ लागली आहे.

हेही वाचा…अनधिकृत बांधकामांना दंडाची पळवाट!  नवी मुंबईसाठी ‘सिडको’चा प्रस्ताव; सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधदंड आकारणी कशी असेल?

रानसई धरणातील पाणी उन्हाळ्यात आणि जूनपर्यंत पुरवठा करता यावा या करिता यांचे नियोजन म्हणून मंगळवारची पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी आठवड्यातील नेहमीची कपात आहे. याची सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आली आहे. जी. एन. सोनवणे, उपअभियंता, एमआयडीसी, उरण

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran due to low storage capacity of ransai dam citizens face water shortages every december sud 02