उरण : राज्यात वीज उत्पादन अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्यात आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागडी वीज खरेदी करावी लागत आहे. मात्र वायू पासून स्वस्त वीज निर्माण करण्यात येणाऱ्या वीज प्रकल्पाला शासनाकडून पुरेसा वायू पुरवठा होत नसल्याने ६७२ मेगावॉट क्षमता असलेल्या उरणच्या वायू विद्युत प्रकल्पातून अवघे ३०० मेगावॉट वीज उत्पादन होत आहे. या प्रकल्पाकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे.

गेल्या २५ वर्षात आता पर्यंतच्या सरकारातील ऊर्जा मंत्र्यांनी या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. तर दुसरीकडे वीज वितरण आणि निर्मितीचे खासगीकरण सुरू असल्याने हा प्रकल्पही त्याच मार्गावर असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. उरणचा वायू विद्युत प्रकल्प हा १९८२ ला सुरू करण्यात आला आहे. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हा वायू वर वीज उत्पादन करणारा पहिला प्रकल्प आहे. ४२ वर्षा पूर्वी या प्रकल्पाची उत्पादन क्षमता ९०० मेगा वॉट होती. मात्र गेल्या अनेक वर्षात येथील वीज निर्मिती करणारे संच नादुरुस्त किंवा बंद पडल्याने वीज उत्पादन क्षमता कमी होऊन सध्या ती ६७२ मेगा वॉट वर आली आहे. त्यातही सध्या केवळ ३०० मेगा वॉट वीज निर्मिती केली जात आहे.

Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
CIDCO announced rates of 26 thousand houses in Navi Mumbai
परवडणारे घर ७४ लाखांचे! सिडकोच्या अल्प उत्पन्न घरांचे दर पाहून अर्जदार अवाक
Three generations of 74 Panvel tribal families remain homeless
तीन पिढ्यांच्या वास्तव्यानंतर आदिवासी हक्काच्या घरापासून वंचित, पनवेलच्या विकास आराखड्यातील हरकतीवर सुनावणी
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!
What Poona Mahajan Said About Uddhav Thackeray ?
Poonam Mahajan : “लोकसभेला तिकिट कापण्यात आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी…”, पूनम महाजन काय म्हणाल्या?

हेही वाचा…नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पा वर आधारित हा वायू विद्युत केंद्र असून गेल(गॅस अथोरिटी) कडून प्रकल्पाला वीज पुरवठा केला जात आहे. प्रकल्प संपूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ३ २ एमएमएसएमडी वायूची आवश्यकता आहे. मात्र पुरवठा केवळ २.२ एमएमएसएमडी केला जात आहे. ही स्थिती मागील अनेक दिवसांपासून आहे.

हेही वाचा…Torres Ponzi Scam: ‘असा’ झाला टोरेस कंपनीचा घोटाळा; मालक विदेशात फरार, अनिश्चिततेत गुंतवणूकदार!

स्वस्त वीज निर्मिती

टाकाऊतून टिकाऊ या धर्तीवर प्रकल्पात वायूची वाफ करून वीजनिर्मिती केली जाते याच वाफेचे पाणी होती. या पाण्यावर प्रक्रिया करून जवळपास ६० मेगावॉट वीज निर्मिती केली जात आहे. यामुळे सर्वात स्वस्त वीजनिर्मिती होते.

वायू विद्युत प्रकल्पाची क्षमता ६७२ मेगावॉट आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मागणीप्रमाणे वीज निर्मिती केली जात असून सद्या ३१० मेगावॉट पर्यंत वीज उत्पादन केले जात आहे. मोहन आव्हाड, मुख्य अभियंता,वायू विद्युत प्रकल्प, उरण.

Story img Loader