उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव १२ वर्षांपासून प्रलंबित; रुग्णांना मुंबई, नवी मुंबईचा आधार

उरण : शहरात वाहतूक कोंडी, पाणी या समस्यांबरोबर आरोग्य सेवाही तोकडी आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयाची गरज असून गेली १२ वर्षांपासून याबाबत चर्चा आहे, मात्र अद्याप ही सेवा उरणकरांना मिळाली नाही. त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याने नागरिकांना पनवेल, नवी मुंबईतील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

nashik health department alerted and establishments started necessary measures due to gbs patients
राज्यातील जीबीएस रुग्णवाढीमुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क, आवश्यक कार्यवाही प्रारंभ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Nine years of delay in transferring health centers causes patient suffering due to controversy
आरोग्य केंद्रे हस्तांतरण वादाचा रुग्णांना फटका, केंद्रांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
100 bed hospital in Uran is stalled again causing another delay after fifteen years
उरणचे उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, मंजुरी आणि भूमिपूजनानंतरही इमारतीचे काम रखडलेलेच
transport and commercial complex will be set up on site of Dahisar Zakat Station on Western Expressway
मुंबई महानगरपालिका वर्षभरात २५ ‘आपला दवाखाना’ सुरू करणार
private hospitals in pune city violating rules
पुण्यातील खासगी रुग्णालयांकडून नियम धाब्यावर! आरोग्य विभागाकडून कारवाईचे पाऊल
nirmala sitharaman medical colleges
अर्थसंकल्पात वैद्यकीय जागांमध्ये वाढ… परंतु शिक्षक कुठून आणणार?
22 health care centers closed due to local opposition have to find new location
स्थानिकांच्या विरोधामुळे २२ आरोग्यवर्धिनी केंद्र अधांतरी, नवीन जागा शोधण्याची वेळ

उरण परिसर हा गेली काही वर्षे विकसित होत आहे. त्यामुळे तेथील सर्वच व्यवस्थेवर ताण पडला आहे. त्या मानाने व्यवस्था नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या शहरात सुसज्ज असे रुग्णालय व्हावे, अशी येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. गेली १२ वर्षांपूर्वी  शासनाकडून उरण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याकरिता सिडकोकडून उरण पनवेल महामार्गालगत भूखंडही देण्यात आलेला आहे. असे असले तरी आजपर्यंत या रुग्णालयाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. तर या भूखंडावर सध्या गवताचे जंगल तयार झाले आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांना खास करून सामान्य नागरिकांवर उपचाराकरिता रुग्णालयाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

उरण शहरामध्ये ३० खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय असले तरी या रुग्णालयात आवश्यक त्या व्याधींवर उपचार करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे येथे उपचाराकरिता आलेल्या रुग्णांना पुढील उपचाराकरिता नवी मुंबईमध्ये पाठविण्यात येत आहे. सध्या पनवेल येथे उपजिल्हा रुग्णालय असले तरी त्यासाठी पनवेल गाठावे लागत असल्याने उपचारापेक्षा प्रवासावर अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याने नागरिकांना उरणमध्येच उपचार मिळावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर भूखंड ताब्यात असतानाही शासनाकडून या रुग्णालयाच्या उभारणीत दिरंगाई केली जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

उपचारासाठी मुंबई, नवी मुंबईचा पर्याय

उरण हे सध्या नवी मुंबईतील विकसित होणारे शहर असून या शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे सुसज्ज असे एकही रुग्णालय नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मुंबई व नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

उरणमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाकडून तसेच येथील उद्योगांकडून निधी गोळा करण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या जागेची पाहणी यापर्वी युती  सरकारमधील आरोग्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली होती. आराखडा तयार करण्यात आलेला असला तरी त्याचे पुढे काय झाले? 

– सुधीर पाटील, नागरिक, उरण

Story img Loader