उरण : जेएनपीए बंदरातील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी बंदराच्या प्रशासन भवना समोर धो धो मुसधार पावसात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
न्हावा शेवा बंदर कामगार संघटना(अंतर्गत) या कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे सचिव व अखिल भारतीय बंदर कामगारांचे नेते कॉ. भूषण पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व गणेश घरत,जगजीवन भोईर,संदीप पाटील,हिरामण पाटील आदींनी केले.
हेही वाचा…पनवेलच्या गाढी नदीपात्रात मोटार अडकली
आंदोलनात प्रामुख्याने जेएनपीए कामगारांचे नवीन वेतन करार करा,मागील दीड वर्षांपासून थकीत बोनस द्या,कामगारांना कॅफेटरीया भत्ता,तसेच जॉर्ज कमिटीच्या शिफारशींची अमंलबजावणी करा, तसेच बढती मुळे रिक्त झालेल्या जागा त्वरित भरा किंवा कायम कामगार कामगारांच्या तर बंदरातील कंत्राटी कामगारांना किमान २६ हजार रुपये वेतन द्या,ग्रॅज्युएटी,वैद्यकीय सुविधा द्या आदी मागण्यासह जेएनपीए बाधित प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडाचे त्वरीत ताबा देण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.