उरण : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झालेल्या उरण – खारकोपर लोकलला उरणच्या प्रवाशांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. शनिवारी सकाळ पासूनच स्थानकात प्रवाशांची वर्दळ सुरू झाली होती. उरण स्थानकातून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांची नेरुळसाठी पहिली लोकल सुटली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…नवी मुंबई : मोदींच्या सभेला जाण्या-येण्यासाठी तब्बल १०० एनएमएमटी बस

या पहिल्या लोकलने नवी मुंबई आणि मुंबईत नोकरी निमित्ताने प्रवास करणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांनी लाभ घेत प्रवास केला. साधारणतः अर्ध्या तासांनी सुटणाऱ्या प्रत्येक लोकलने उरण मधील प्रवासी प्रवास करीत असतांना दिसत होते. लोकलच्या प्रारंभीच उरणच्या प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.