उरण : शहरातील पहिल्याच वायुवरील शवदाहिनी प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरणस्नेही प्रकल्पाची प्रतीक्षा आहे. हा प्रकल्प ऑगस्ट अखेरपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचा दावा उरण नगर परिषदेने केला आहे. उरण नगर परिषदेने शहरातील बोरी येथे एक कोटी खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, पैशाचीही बचत होणार असून पर्यावरणाचे रक्षण व प्रदूषणाला पर्याय ठरणार आहे.

उरण शहरवासीयांसाठी पर्यावरणपूरक वायूवर चालणारी शवदाहिनी बोरी स्मशानभूमीत उभारण्यात आली आहे. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारलेला गॅसवर आधारित शवदाहिनी प्रकल्प लाकडांवर जळीत करण्यामुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाला पर्याय ठरणारा आहे. त्याशिवाय नाममात्र दराच्या आकारणीमुळे वेळ, पैशाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून परिसरातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

हेही वाचा…भाजपच्या बेलापुरात नाईकांचा ‘सांगली पॅटर्न’?

उरण शहराची लोकसंख्या ३५ हजारांहून अधिक आहे. त्यातच परिसरातील वाढत्या औद्याोगिक पसाऱ्यामुळे लोकसंख्येत वाढ चालली आहे. त्यामुळे वाढत्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातातील आणि बेवारस मृतदेहाच्या दिनाचा ताणही उनपला सोसावा लागत आहे. तशी शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत शहरात बोरी, भवरा, मोरा अशी तीन ठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था आहे.

वाढते प्रदूषण व वृक्षतोडीमुळे निसर्गाचाही समतोल ढासळत चालला आहे. यावर उपाययोजना म्हणून शासनच पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदुषण रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून उरण शहरातील स्मशानभूमीमध्येही गॅस शवदाहिनी उभारण्यात आली असून ऑगस्टअखेरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.

हेही वाचा…राष्ट्रीय महामार्गांची चाळण, जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर खड्डेच खड्डे

प्रचलित विधीसाठी ५०० ते ७५० किलो लाकूडफाटा

दररोज रात्री- अपरात्री मृतदेहांचे दहन करण्यासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांना लाकूडफाटा उपलब्ध करून देण्याचे काम उनपला करावे लागते. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार अंत्यविधीसाठी कमीत कमी ५०० ते ७५० किलो लाकूडफाटा लागते. यासाठी साधारणपणे पाच हजारांहून अधिक खर्च करावा लागतो. त्याशिवाय मृतदेहांची राख होईपर्यंत नातेवाईकांसह आलेल्या आप्तेष्टांना नाहक तीन-चार तास अंत्यसंस्कारासाठी ताटकळत स्मशानभूमीतच बसावे लागते.यामुळे मृतांच्या नातेवाईकांना नाहक खर्चाच्या तसेच नाहक वाया जाणाऱ्या वेळेच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने मनस्तापही सहन करावा लागतो. मात्र उनपच्या या शवदाहिनीमुळे नागरिकांचा त्रास कमी होण्यास मदत मिळणार आहे.