गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्थी च्या कालावधीत उरण शहरातील विसर्जन करतांना निर्माल्य तलावात न टाकता ते निर्माल्य कलशात गोळा करून जमा झालेल्या एकूण दिड टन निर्माल्यातून शहरातील नागरिकांसाठी नगरपरिषदेने बायोगॅस व खताची निर्मिती केली आहे.
हेही वाचा >>>चौदा गावांच्या समावेशाने नवी मुंबईकर नाराज
उरण नगरपरिषदे ने गणेशोत्सवात विसर्जनावेळी नागरिकांनी आणलेले निर्माल्य तलावात न टाकता निर्माल्य कलशात गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. यावेळी उरण नगरपरिषदेने विमला तलाव आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्या पासून बायोगॅस व खत निर्मिती केली आहे .
हेही वाचा >>> नवी मुंबईच्या विकास आराखड्यावर तुरळक हरकती
जल ,नैसर्गिक व मानवनिर्मित पाण्याचे स्त्रोताचे संवर्धन व संरक्षण व्हावे ,तलावातील पाण्याचे प्रदूषण होवू नये हा उद्देश ठेउनच निर्माल्य तलावात न टाकता ते स्वतंत्र व्यवस्था केलेल्या ठिकाणी टाकण्याचे आवाहन नगरपरिषदे कडून करण्यात आले होते. जेणे करून जमा केलेल्या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यातील ओल्या निर्माल्यापासून बायोगॅस व खत निर्मिती केली केली असल्याची माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली आहे. या कामात नगरपरिषदेचे कर्मचारी व लोकप्रतिनिधी व उरणच्या नागरिकांनी मदत केली.