उरण नगरपालिकेला जाग
उरण नगरपालिकेच्या सानेगुरुजी बालोद्यानातील खेळणी अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाल्याने लहान मुलांचा हिरमोड होत होता. येथे नवीन खेळणी बसवावीत ही अनेक पालकांची मागणी वर्षभराने का होईना मान्य झाल्याने मुलांनी तसेच पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
तीस हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या उरण नगरपालिकेच्या हद्दीत मोजून तीन बालोद्याने आहेत. त्यापैकी उरण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले विमला तलावातील सानेगुरुजी बालोद्यान सर्वाच्या सोयीचे आहे. या बालोद्यानातील खेळणी गेली अनेक वर्षे बदलली गेलेली नाहीत. येथील फायबरच्या घसरगुंडय़ा अनेक ठिकाणी तुटल्याने मुलांना इजा होण्याची शक्यता होती. या बागेतील पाळण्यांच्या साखळ्याही गंजल्या होत्या. विमला तलावातील दुसऱ्या भागात असलेली खेळणीही काढल्याने मुलांना कमी खेळण्यांत समाधान मानावे लागत होते.
त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत तरी मुलांना खेळण्यासाठी बालोद्यानात खेळणी उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी उरणमधील नागरिकांकडून केली जात होती. या गैरसोयीबाबत लोकसत्तामधूनही आवाज उठविण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran municipal council to buy new toys for children garden
Show comments