Navi Mumbnai Murder Case Update : उरण येथील यशश्री शिंदे ( Yashshree Shinde ) या २२ वर्षीय तरुणीच्या हत्याकांडाने सगळा देश हादरला. या प्रकरणातला आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी यशश्री शिंदेच्या हत्येचा घटनाक्रम माध्यमांना सांगितला. यशश्री शिंदेच्या हत्येनंतरचा हा पाचवा दिवस आहे. आरोपी दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे मित्र, स्थानिक लोक या सगळ्यांची मदत घेतली.

पोलिसांनी काय सांगितलं?

२५ जुलैला यशश्री शिंदे ( Yashshree Shinde ) बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचं ( Yashshree Shinde ) प्रेत आम्हाला सापडलं. त्यानंतर शनिवार सकाळी म्हणजेच २७ जुलैला खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणात आम्ही दोन ते तीन संशयित शोधले होते. त्यांच्या शोधासाठी आम्ही नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी शोध पथक पाठवलं. ज्या गोष्टी आम्हाला कळत होत्या त्या कर्नाटकमध्ये आम्ही पथकाला देत होतो. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आली. दाऊदचं नेमकं लोकेशन काय? ते आम्हाला सापडत नव्हतं. आम्हाला हे समजलं होतं की दाऊद शेख कर्नाटकचा आहे. त्यानंतर त्याचे नातेवाईक, त्याचा मित्र या सगळ्यांची माहिती आम्हाला कामाला आली. यातला मौसिन नावाचा संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. मात्र त्याने हत्या केलेली नाही. दाऊद आणि यशश्री या दोघांचा काहीही संपर्क नव्हता. त्याची चौकशी आम्ही करतो आहोत. कारण त्याने गुन्हा मान्य केला आहे असंही पोलिसांनी सांगितलं.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Yashshree Shinde Murder News
यशश्री शिंदे या मुलीच्या हत्येआधीचं फुटेज आता समोर आलं आहे. या फुटेजमध्ये दाऊद तिच्या मागे गेला होता हे दिसतंं आहे.

हे पण वाचा- Yashshree Shinde Murder : यशश्रीच्या हत्येआधीचं सीसीटीव्ही फुटेज समोर, पाठलाग करताना दिसतो आहे दाऊद शेख

यशश्रीच्या हत्येचा घटनाक्रम काय?

दाऊदने यशश्रीला ( Yashshree Shinde ) भेटायला बोलवलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाली असावी. त्यात काही गोष्टी घडल्या ज्यानंतर दाऊदने तिच्यावर वार केले. तिच्या पोटावर, प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक वार झाल्याच्या खुणा आढळून आल्या. यशश्रीच्या ( Yashshree Shinde ) मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल यायचा आहे. मात्र तिच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा जास्त प्रमाणात आहेत. तसंच तिच्या चेहऱ्याचे कुत्र्यांनी लचके तोडले असण्याची शक्यता आहे. २५ जुलैलाच दाऊदने तिची हत्या केली. हे दोघंही एके ठिकाणी भेटल्यानंतर त्यावेळी नेमकं काय घडलं? दाऊदने तिची हत्या का केली? याची माहिती आम्ही घेत आहोत. यशश्रीची ( Yashshree Shinde ) हत्या वारंवार भोसकल्यामुळेच झाली. मात्र नक्की काय घडलं ते आम्ही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सांगू शकतो असं पोलिसांनी माध्यमांना सांगितलं. आरोपीकडे पीडितेचा मोबाइल आम्हाला अद्याप मिळालेला नाही. आम्ही त्या मोबाईलचा शोध घेत आहोत. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त दीपक सकोर यांनी ही माहिती दिली.

दाऊद शेखने करोनाच्या दरम्यान उरण सोडलं होतं

दाऊद शेख हा अनेक दिवस उरणला वास्तव्य करत होता. त्याच्यावर पॉक्सो प्रकरणात आरोप झाले आणि त्याला तुरुंगात जावं लागलं ज्यानंतर त्याने उरण सोडलं. करोना काळाच्या दरम्यान दाऊद शेख कर्नाटकमध्ये वास्तव्य करत होता आणि तिथे तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याने एक दोन कंपन्यांमधली नोकरी बदलली होती. त्याच्याविषयीची इतर माहितीही आम्ही गोळा करत आहोत. असं पोलिसांनी सांगितलं.