जगदीश तांडेल, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : उरण नगर परिषदेच्या अद्यायावत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, की आचारसंहितेत अडकणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ६.५० कोटी खर्चातून उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र लोकसभेसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता असल्याने कार्यालय पूर्ण होऊनही अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

५० कोटींहून अधिक वार्षिक बजेट असलेल्या उरण नगर परिषदेला आठ वर्षांत नियोजित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे कामगारांना पावसाळ्यात गळक्या छताखाली कामकाज करावे लागत आहे. उरण नगर परिषदेचे कामकाज वाढले असून सुसज्ज आणि प्रशस्त अशा जागेची आवश्यकता आहे. १८ व्या शतकातील उरण नगर परिषदेने १५० पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. नागरीकरण वाढल्याने व्यवसाय आणि व्यवहारांतही वाढ झाली आहे. त्यामुळे या शहराचा कारभार हाकण्यासाठी अद्यायावत कार्यालयाची आवश्यकता आहे.

आणखी वाचा-नवी मुंबईतील ४५०० अनधिकृत बांधकामे पाडणार?

२५ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर २० वाहनांसाठी तळ, पहिल्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालये, दुसऱ्या मजल्यावर अद्यायावत सभागृह आणि उ.न.प.ला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधकाम करण्यात येणार आहे. नियोजित प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. फर्निचरचीऑर्डर दिली आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होऊन कार्यालय सुरू होईल, अशी माहिती उ.न.प.चे मुख्य अधिकारी समीर जाधव यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran nagar parishad office will get stuck in the code of conduct mrj
Show comments