उरण : करंजा टर्मिनल बंदरातील कामात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या मागणीसाठी शनिवारी उरण पनवेल लॉरी मालक संघाच्या वतीने बंदराच्या प्रवेशद्वारावर पत्रकार परीषद घेऊन मागणी करण्यात आली. यावेळी स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे,परप्रांतीय वाहने बंद करून येथील स्थानिकांना हक्काचा रोजगार मिळावा,स्थानकीकांच्या एकजुटीचा विजय असो,प्रकल्पग्रस्तांच्या एकजूटीचा विजय असो या घोषणा करीत तसेच स्थानिक आणि इतरांना ही रोजगार मिळावा त्यासाठी प्रकल्प बंदर आणि विभाग आणि संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात चर्चा करण्याची मागणी केली.

हे ही वाचा…नवी मुंबई : पुनर्विकासातील ‘लबाडी’ला अंकुश! इमारत धोकादायक नसतानाही पुनर्विकासाचा घाट घालणाऱ्यांवर वचक

करंजा बंदर प्रशासनाने लॉरी मालक संघटनेच्या वतीने वारंवार दिलेल्या पत्रांना साधं उत्तर दिलल नाही. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना कमी लेखून काम करीत आहेत. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी बंदराच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा उरण पनवेल लॉरी मालक संघाचे अध्यक्ष संतोष घरत दिली. यावेळी संघटनेचे नेते नरेश घरत,सुहास घरत,रमाकांत म्हात्रे,सुनील घरत,पंडित घरत यांनी भूमिका मांडली.तोडगा न निघाल्यास सोमवारी आंदोलन करून चक्का जाम करण्याचा इशारा दिला आहे.

Story img Loader