उरण : नगरपरिषदेने उरण-मोरा मार्गावर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी पेन्शनर्स पार्क तयार केलं होतं. मात्र सध्या या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून येथील पदपथावर नगरपरिषदेने लावलेल्या फलकाव्यतिरिक्त पाय ठेवण्यासाठी एक इंचसुद्धा जागा शिल्लक नाही. याकडे उरण नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे निवृत्त व ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

उरण शहरातील ज्येष्ठ खासकरून निवृत्त नागरिकांना गप्पा आणि विरंगुळा म्हणून बसता यावे याकरिता उरण मोरा मार्गावर पेन्शनर्स पार्क जाहीर करण्यात आलं होतं. याठिकाणी तसा उरण नगर परिषदेचा फलक आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था म्हणून बाकडेही होते. त्यामुळे शहरातील आणि तालुक्यातील कामानिमित्त ये जा करणारे निवृत्त त्याचा लाभ घेत होते. मात्र हळूहळू येथीलबाकडे गायब झाले. त्यानंतर या जागेत अनेक व्यवसाय सुरू झाले. त्यांच्या अतिक्रमणामुळे सध्या येथील पदपथावरील पेन्शनर्स पार्क हा फलक तेवढा शिल्लक आहे. या संदर्भात उरण नगरपरिषदेने मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद नव्हता.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

हेही वाचा – उरण : शहरावर आता सीसीटीव्हीची नजर, महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांचा २४ तास वॉच

हेही वाचा – पनवेल : हवाई शहरात १४,३२० कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राटाची कामे फेब्रुवारीत सुरू होणार, सिडकोचे आश्वासन

उरणमधील ज्येष्ठ आणि निवृत्त नागरिकांची संख्या वाढली आहे. आशा नागरिकांना बसण्यासाठी असलेलं उरणमधील एकमेव ठिकाण शिल्लक राहिलेलं नाही. याकडे नगरपरिषदेने लक्ष द्यावे, अशी मागणी संरक्षण विभागातील निवृत्त कर्मचारी अशोक जी. म्हात्रे यांनी केली आहे.