उरण : उरण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सिंधू तुकाराम मुंडे यांना गुरुवारी ठाणे विभागाच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. उरण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उरण पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुंडे यांनी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एका गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या नातेवाईकाडून ६० हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात आरोपीच्या नातेवाईकांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार गुरुवारी ठाणे लाचलुचपत विभागच्या उपअधीक्षक अश्विनी पाटील यांच्या पथकाने सापळा रचून उरण पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मुंडे यांना ५० हजार रुपयांची रोख रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.