उरण : पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिना सरला असून या महिनाभरात सरासरीच्या फक्त दहा टक्के पावसाची नोंद झाली आहे. २०२१ मध्ये जून महिन्यात ६६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती, तर या वर्षी २२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
बुधवारपासून काही प्रमाणात पाऊस होत आहे. गुरुवारी पावसाचे प्रमाण चांगले होते. मात्र जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्यास उरणच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. अशा प्रकारची स्थिती २०१५ या वर्षीही निर्माण झाली होती.
उरण तालुक्यात वर्षाला ३ हजार मिलिमीटरपेक्षा अधिकच्या पावसाची नोंद होते. त्यामुळे बहूतांशी वर्षी ही सरासरी पावसाने गाठली आहे. या वर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे पिण्याच्या पाण्यासह, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.