उरण : शारदोत्सवाला सुरुवात झाली असून तालुक्यातील आदिशक्तीचा जागर सुरू झाला आहे. यासाठी अनेक गावातील देवीची मंदिरे सजली आहेत. तर उरणमध्ये सार्वजनिक ९९ मूर्ती, ११ घट आणि दोन प्रतिमांची स्थापना करण्यात येणार आहे.

या नवरात्रोत्सवाची विशेषत: तरुणाईला मोठी उत्सुकता लागून राहिलेली असते. तालुक्यातील काही ठरावीक नवरात्रोत्सव मंडळ सातत्याने रास-गरबा नृत्याबरोबरच विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

crores of revenue is not being collected in Gadchiroli due to sand smugglers instalments
विकासात राज्याचा पहिला जिल्हा होऊ पाहणाऱ्या गडचिरोलीत वाळू तस्करांच्या हप्त्यांमुळे…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
vasai naigaon marathi news
वसई : दहा वर्षांपासून नायगाव खाडी पुलाचे काम अपूर्णच, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कामकाज ठप्प
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
Chichghat Rathi village in Vidarbha
गाव करी ते राव नं करी, ‘हे’ गाव ठरले विदर्भात अव्वल

हे ही वाचा…उरणच्या बाह्यवळण मार्गाला भूसंपादनाचा अडथळा

यामध्ये उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६५, न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०, तर मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे कार्यरत आहेत. या ९९ सार्वजनिक नवरात्र मंडळांनी ९९ मूर्तींची स्थापना केली आहे.

शहरातील गुरुकुल अॅकॅडमी, जवाहरलाल नेहरू बंदर कामगार वसाहतीतील ऐश्वर्या कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा ऐश्वर्या रास गरबा, चिरनेर येथील शिवसेनाप्रणित नवरात्रोत्सव मंडळ, करंजा येथील नवापाडा मित्र मंडळाचा फक्त महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा ड्रेसकोडच्या तालावर थिरकणारा गरबा आणि परिसरात इतर ठिकाणी सुरू झालेल्या रास-गरब्यांना सुरुवात झाली आहे. तर उरण परिसरातील आई जगदंबेची अनेक मंदिरे आहेत.

हे ही वाचा…शिंदे गटाच्या शहरप्रमुखाचा पोलिसांसमोर थयथयाट नवरात्रोत्सवाची जागा, कमानी, दिव्यांचे खांब काढण्यावरून वादंग

विविध मंदिरांत नवरात्रोत्सव

करंजा येथील द्रोणागिरी देवी, उरण शहरातील उरणावती देवी, डोंगरीची अंबादेवी, नवीन शेव्यामधील शांतेश्वरी देवी, जसखार येथील रत्नेश्वरी देवी, फुंडे येथील घुरबादेवी, चिरनेरच्या इंद्रायणीच्या डोंगरमाथ्यावर विराजमान असलेली आणि मोरा येथील एकवीरा देवी, पीरवाडी येथील मागीणदेवी, उरण शहरातील शीतलादेवी, न्हावा येथील गावदेवी, गव्हाण येथील शांतादेवी अशा अनेक देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवादरम्यान देवीचा जागर केला जातो.

Story img Loader