उरण : सिडकोकडून वसविण्यात येणाऱ्या पुष्पकनगर व द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनतळ व ढाबे सुरू आहेत. याकडे सिडकोचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. मात्र त्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्ग तसेच मुख्य मार्गावरही अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले आहेत.

सरकारने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मात्र सिडकोकडून अनधिकृत टपऱ्या आणि भूमिपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या विरोधात भूमिपूत्र लढत आहेत. असे असताना सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे अवजड वाहनांचे वाहनतळ सुरू आहेत. यातील अनेक वाहनतळावरून भाड्याची वसुली केली जात आहे. द्रोणागिरी आणि पुष्पकनगर परिसरांत या वाहनतळांची संख्या मोठी आहे. याच अनधिकृत वाहनतळांशेजारी ढाबेही उभारण्यात आले आहेत. या ढाब्यातून विक्री करण्यात येणारे पदार्थ आणि वस्तू यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
in navi mumbai cidco Contractor officials faced villagers anger after arriving to start work in Devad on Wednesday
नैना प्रकल्पाचे काम करण्यासाठी आलेल्या अधिका-यांना पिटाळले

हेही वाचा – घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत

हेही वाचा – १५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे

राज्यात ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनांत वाढ झाल्याने शासनाने पाऊल उचलले होते. मात्र ही कारवाई पुन्हा एकदा थंडावली आहे. याच वाहनतळांच्या परिसरात बंदी असलेला गुटखा विक्री केली जात आहे. त्यामुळे अमली पदार्थविरोधी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. सिडकोच्या दुर्लक्षामुळे यात वाढ झाली आहे. या संदर्भात सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता याची माहिती घेऊन खात्री करावी लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Story img Loader