जगदीश तांडेल,लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : पिरवाडीला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी सुशोभीकरण करण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव मेरिटाईम बोर्डाकडून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी या किनाऱ्याचे सुशोभीकरण करून त्याला नवीन साज चढविला जाणार आहे. हा उरणचा रत्नहार पर्यटकांसाठी सजविला जाणार असल्याने पर्यटकांना आकर्षित करून उरणच्या पर्यटन व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे.

उरणच्या पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी मांदियाळी भरते. उन्हामुळे होणारी अंगाची काहिली शमविण्यासाठी तसेच शुद्ध हवेसाठी पर्यटक समुद्रात डुंबण्याचा तसेच लाटांचा आनंद घेत आहेत. उरण मधील पिरवाडी हा तसा छोटासा किनारा आहे. मात्र तरीही या किनारपट्टीवर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. सध्या मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. या परिसरात मुंबईच्या धर्तीवर उच्च दर्जाच्या राहण्या खाण्याच्या सुविधा म्हणून हॉटेल्स उभे राहिले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील इतर समुद्र किनाऱ्याप्रमाणे समुद्री पर्यटनासाठी पर्यटकांची पावले आता वळू लागली आहेत. याचा परिणाम आपोआपच पर्यटन आणि इथल्या व्यवसाय वाढीवर होऊ लागला आहे.

आणखी वाचा-पनवेल: दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोची ३६ भूखंडविक्री योजना

मुंबई, ठाणे व नवीमुंबईतील पर्यटक

उरण पिरवाडी किनाऱ्यावर एक दर्गा असून या दर्ग्यावर येणारे भाविक हे मुंबई, ठाणे व नवी मुंबई सह इतर ठिकाणाहून येतात. यातील बहुतेक पर्यटक हे रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी येतात. त्यामुळे सध्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.

उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. त्या कामाची सुरुवात लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावर अनेक सुविधा रस्ता आदी उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आमदार महेश बालदी यांनी दिली.

आणखी वाचा-आता विष्णुदास भावे नाट्यगृहात पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार

समुद्रात जाणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर

सुट्ट्यामुळे उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पोहता न येणारे पर्यटकांच्या ही सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड किनाऱ्यावरील पर्यटकांच्या मृत्यु नंतर शासनाने पुन्हा एकदा सागरी सुरक्षा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उरणच्या किनाऱ्यावर त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. येथील स्वयंसेवी सागरी सुरक्षा करणाऱ्या तरुणांना जीव रक्षक साधना शिवाय बचावाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला पाहणी मनोरा ही सडून गेला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urans pirwadi coast will be decorated for tourists mrj