नवी मुंबई पालिकेच्यावतीने बेलापूर सेक्टर १५ मधील ३४ हजार चौरस मीटर भूखंड जवळपास ५० टक्के सवलतीच्या दरात देण्याचे आदेश नगरविकास विभागाने सिडकोला दिले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रस्ताव दिला होता. करोना काळात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आणखी एक सार्वजनिक रुग्णालयातची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा- डॉ. मनीष पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच; सिडको आणि प्रशासन यांच्यातील बैठक अनिर्णित

आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता

करोना काळात नवी मुंबईत रुग्णसंख्या वाढली असतांना शासकीय रुग्णालय अपुरी पडली होती. खाजगी रुग्णालये यावेळी जोरात होती. त्यामुळे नवी मुंबईत आणखी एका सार्वजनिक रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयाची मागणी म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सिडकोने काही भाग सिआरझेडचा असलेला बेलापूर सेक्टर १५ अ मधील ३४ हजार ८००चौरस मीटरचा भूखंड पालिकेला देऊ केला आहे. पण यासाठी सिडकोला १०७ कोटी रुपये मोजावे लागणार होते.

हेही वाचा- भाज्या कडाडल्या! ; पावसाच्या तडाख्याने पिकहानी : कोथिंबीर जुडी शंभरीपार

शिल्लक निधी रुग्णालयाच्या बांधकामासाठी कामी येणार

सार्वजनिक सेवेसाठी सिडको बाजारभाव घेणार असेल तर ते योग्य ठरणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी मांडली. त्यामुळे नगरविकास विभागाने बाजारभावाच्या अनुक्रमे १५० व २०० टक्के दरात हा भूखंड देण्यात यावा, असे आदेश मंगळवारी दिले आहेत. १०७ कोटी रुपयांचा हा भूखंड आता ५० ते ६० कोटीला मिळू शकणार आहे. त्यामुळे शिल्लक निधी या रुग्णालयाच्या बांधकामासाठी कामी येणार आहे. येत्या चार वर्षांत हे रुग्णालय आणि महाविद्यालय उभे राहणार आहे.

Story img Loader