वाहनचोरी व घरफोडी रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सुरक्षाविषयक उपकरणांचे प्रदर्शन वाशी येथील इन ऑर्बिट मॉलमध्ये शनिवारी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेदरम्यान नवी मुंबई पोलिसांनी आयोजित केले आहे. या प्रदर्शनात वाहनांमध्ये लावण्यात येणारे गिअर लॉक, व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टम तसेच घरातील दरवाजास लावण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणा याबाबत माहिती देणार आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

Story img Loader