पनवेल – खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात तीन वेगवेगळ्या अवयव प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रीया यशस्वी पार पडल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. या तीनही प्रत्यारोपनात पत्नी आणि बहिणींनी अवयवदाते होऊन आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवले आहेत. या तीनही अवयव दात्यांमुळे यावेळचा व्हॅलेंटाईन डे तीन कुटुंब साजरा करू शकले आहेत. पत्नीने पतीसाठी आणि बहिणीने भावासाठी केलेल्या अवयवदानामुळे नात्यांमधील प्रेमाचा ओलावा पाहून मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉक्टरांनी या अनोख्या प्रेमाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नूकतेच मेडिकव्हर रुग्णालयाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या तीन अनोख्या अवयवदानाची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. ३८ वर्षीय रवींद्रनाथ शेंदरे यांना हिपॅटायटीस-बी या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांचे नोव्हेंबर महिन्यात यकृत निकामी झाले आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तपासणीअंती उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने यकृत प्रत्यारोपण हाच पर्याय समोर आला. अखेर रविंद्रनाथ यांची पत्नी दीपाली यांनी यकृत दान करण्याचा निर्णय घेतला आणि मग प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया पार पडली. सध्या यकृतदाता आणि प्राप्तकर्ता या दोघांची प्रकृती बरी आहे. तसेच बड चियारी सिंड्रोमचे निदान झालेल्या औरंगाबाद येथील ३८ वर्षीय महेंद्र बोरडे-पाटील हे ५ वर्षांपासून आजारी आहेत, त्यांच्यावर विविध उपचार सुरू होते, वेनोप्लास्टी करण्यात आली होती. मात्र रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि शेवटी यकृत प्रत्यारोपण हा एकच मार्ग त्यांच्यासमोर होता. पण, त्यांचा रक्तगट बी होता आणि त्यांच्या कुटुंबात कोणताही रक्तगट जुळणारा रक्तदाता नव्हता. त्यांची पत्नी रुपाली यांनी यकृत दान करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यांचाही रक्तगट ए होता. हे आव्हान स्वीकारत मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी एबीओ- विसंगत यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या केल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगीतले.

हेही वाचा – नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा अन्यथा सिडकोच्या स्थापना दिनी हल्लाबोल करणार; उरणच्या महामेळाव्यात निर्धार

हेही वाचा – पनवेल: नैना’विरोधात सूकापूरमध्ये उत्स्फुर्त बंद

सध्या या दोघांची प्रकृती बरी आहे. नांदेड येथील ३७ वर्षीय दिगंबर देशपांडे यांना ऑटोइम्यून यकृताचा आजार होता. त्यांचे यकृताचे कार्य बिघडत होते आणि लवकरात लवकर यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. त्यांच्या ४७ वर्षीय बहिणीने त्यांना यकृत दानाचा निर्णय घेतला. यकृताचा डावा भाग दिगंबर यांना दान केला. आता रुग्ण उत्तम आहे. अवयव प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रियेत डॉ. हार्दिक पहारी, डॉ.अमृता राज, डॉ. अमेय सोनावणे आणि डॉ. अमरीन सांवत आणि डॉ. जयश्री व्ही यांचा सहभाग असल्याचे मेडिकव्हर रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day unique gift from wife sister in kharghar ssb