वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आंब्याची जादा आवक सुरू झाली असून दरात घसरण पहावयास मिळत आहे. सध्या बाजारात देवगगड, रायगड आणि कर्नाटक येथून ३१ हजार पेटी आवक झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेट्या कोकणातील होपुसच्या आहेत.मात्र सध्या बाजारात ग्राहक नसल्याने हवा तसा हापूसला उठाव नाहीये,त्यामुळे दरात ही घरसण झाली आहे. मागील आठवड्यात ४-६ डझनाला २ हजार ते ६ हजार रुपये दर होता. परंतु आता १ हजार ५००ते ४हजारपर्यंत दर आहेत.
हेही वाचा >>> उरण ते खारकोपर मार्गावरून लोकल धावली
यंदा बाजारात देवगड हापूसच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली. यंदा उत्पादन चांगले असेल असा अंदाज आहे. परंतू मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने उत्पादन लवकर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात मागील वर्षी पेक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये ३ ते ४ पटीने आवक वाढली आहे. होळी नंतर बाजारात हापूसची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आठवड्यापासून बाजारात पंधरा ते पंचवीस हजारापर्यंत हापूसच्या पेटी दाखल झाल्या आहेत. आज शुक्रवारी बाजारात हापूस आंब्याच्या एकूण ३१ हजार पेटी दाखल झाल्या असून यामध्ये २२ हजार कोकणातील तर रायगड, कर्नाटक येथून ९ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. परंतु सध्या बाजारात ग्राहक नसल्याने हापूसला मागणी कमी आहे. पाडव्यानंतर बाजारात हापूसची आवक आणखीन वाढेल तसेच ग्राहकही खरेदीला येतील असे मत व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात प्रति पेटी २ ते ६ हजार रुपयांना उपलब्ध होती परंतु आता आवक ही वाढली असून मालाला उठाव कमी असल्याने दर उतरले आहेत. मागील आठवड्यात २ ते ६ हजार रुपयांवर विक्री होणारी पेटी आता १ हजार ५००ते ४ हजार रुपयांनी विक्री होत आहे.