– अक्षय खुडकर

वाशी : घरगुती मसाले आणि चटण्यांपासून ते सेंद्रिय खाद्यापदार्थांपर्यंत वेगवेगळ्या उत्पादनांचे प्रदर्शन वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात भरवण्यात आले आहे. खरेदीसह येथील उत्पादने आणि सेवांची माहितीही घेता येते.

‘महालक्ष्मी सरस’ हा उमेद अभियानाचा एक भाग आहे. याद्वारे महिलांना रोजगार/उपजीविका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रात राज्यभरातील महिला बचत गटांची उत्पादने आपल्याला पाहायला मिळतात. यात खाद्यापदार्थांसह साड्या, ड्रेस, माती तसेच लाकडाची खेळणी, विभिन्न मसाले, पापड, अगरबत्ती, कोल्हापुरी चप्पल, बंजारा एम्ब्रॉयडरी, वनौषधी तसेच बांबूपासून बनवलेली उत्पादने, चिकू चिप्स अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

हेही वाचा – खाऱ्या पाण्यामुळे शेती नापिकीच्या मार्गावर, उरणमधील दोन हजार हेक्टर जमीन समुद्राच्या भरतीमुळे धोक्यात ?

या प्रदर्शनात अहिल्यानगरवरून आलेल्या शिल्पा बेलोटे यांचा चटण्यांचा स्टॉल आहे. उमेद उपक्रमाअंतर्गत देशातल्या वेगवेगळ्या भागांत त्यांना हे उत्पादन पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. तर अकरावीत शिकणारी नागपूरची प्राची वाघमारे तिची पेंटिंग घेऊन पहिल्यांदाच प्रदर्शनात आली आहे. राज्यातील महिला बचत गटांसह देशातल्या वेगवेगळ्या राज्यांतून आलेले स्टॉलही प्रदर्शनस्थळी पाहायला मिळतात.

महिला सशक्तीकरण हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. ‘महालक्ष्मी सरस’ हा त्याचाच एक भाग आहे. या वर्षी या प्रदर्शनाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील महिलांची उत्पादने आणि सेवा शहरी भागाशी जोडणे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. – रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेद अभियान

हेही वाचा – चार नवीन स्मशानभूमींसाठी पनवेल महापालिकेचा १० कोटींचा निधी

उत्पादने मागवण्याकरिता संकेतस्थळ

ग्रामीण भागतील महिलांच्या उत्पादनांना केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न ठेवता ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून ‘उमेद मार्ट’ नावाने एक संकेतस्थळ सुरू केले आहे.

Story img Loader