नवी मुंबई : सिंघम सारख्या चित्रपटात चपखल बसेल अशी घटना नवी मुंबईतील वाशीत घडली आहे. एक फोन आणि ५ मिनिटात पोलीस हजर. या दोन पोलिसांनी धावत्या बस मध्ये चढत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. हि घटना वाशीत रविवारी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली यात तीन जणांना अटक केली तर चोरलेला मोबाईल मूळ मालकाला देण्यातही आला.एन एम एम टी. या शहर वाहतूक सेवेची मार्ग क्रमांक २०ची वाशीच्या नजीक पोहचत असताना याच बस मध्ये बसलेल्या तीन विद्यार्थांना एक संशयित व्यक्ती आढळला. तो मोबाईल चोर असावा या शक्यतेने त्यातील एकाने विलंब न करता ११२ क्रमांकावर फोन लाऊन सदर माहिती दिली. हि माहिती प्राप्त होताच वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी पोलीस शिपाई परमेश्वर ढोले आणि निलेश चिकणे यांना तातडीने पाठवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवध्या पाच ते सात मिनिटात त्यांनी बस गाठली. वाशीतील बोर्ड कार्यालय बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या धावती बस थांबवण्यात त्यात निलेश चिकणे हे बसच्या पुढील दरवाजातून  आत तर परमेश्वर हे मागील दरवाजातून आत शिरले. विद्यार्थिनी आणि त्यांची नजरानजर होताच संशयित व्यक्तीं कडे निर्देश करताच त्यांना पकडण्यात आले. बस वातानुकुलीन असल्याने दरवाजे उघडायचे नाही असे वाहन चालकाला निर्देश देत बस एका बाजूला घेण्यास लावली. चोरट्यांच्या झडतीत चोरीचे मोबाईल आढळून आले नाहीत. यावर न थांबता परमेश्वर आणि चिकणे यांनी सर्व प्रवाशांना आपापले मोबाईल आहेत का हे पाहून घेण्यास सांगण्यात आले. त्यावेळी एका व्यक्तीचा मोबाईल चोरी झाल्याचे समोर येताच त्या चोरट्यांना वाशी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हेही वाचा : उरण पनवेल मधील मच्छिमारांना मिळणार ९५ कोटींची नुकसानभरपाई ?

पोलिसांनी त्यांच्या खास पद्धतीने समाचार घेतल्यावर त्यांच्या तिसर्या साथीदाराने मोबाईल दिला असल्याची माहिती या दोन चोरट्यांनी दिली. त्यालाही पोलिसांनी पकडून आणले. कार्यालयीन सोपस्कार पार पाडत लगेच मोबाईल मूळ मालकाला देण्यात आला.रमेश चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी) त्या तीन विद्यार्थांच्या सतर्कतेने मोबाईल चोरी करणारी तिघांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. आम्ही त्यांचा सत्कारही केला आहे. सामान्य लोकांच्या सतर्कतेने काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. आणि हे काम विद्यार्थांनी केल्याने त्याचा विशेष आनंद आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vashi police caught the mobile thieves within five minutes vashi navi mumbai tmb 01