नवी मुंबई: वाशी आरटीओकडून शहरात अवैधपणे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येत असून एका दिवसात तब्बल १४ वाहनांवर कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. खासगी प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणे, विना परवाना, योग्यता प्रमाणपत्र करणाऱ्या वाहनांवर हा कारवाईचा फार्स आवळा आहे.
अनेकदा खासगी वाहनांमधून अवैध प्रवासी वाहतुकीबरोबर व्यसायिक मालवाहतुक ही केली जाते. महामार्गावर अवैधपणे प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आरटीओने सोमवारी जुईनगर ते उरण फाटा महामार्गावर खासगी वाहतूक करण्याऱ्या वाहनांची तपासणी केली, यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या, वाहन विमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या अशा १४ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
हेही वाचा… उरण : सुरक्षेची जबाबदारी ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची, पोलीसांनी स्पष्ट केली भूमिका
मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. पुढील कालावधीत ही अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार आहे, अशी माहिती नवी मुंबई आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे.