वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी भाजीपाल्याचे दर कडाडले असून बहुतांश भाज्या महागल्या आहेत. हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार,  शिमला मिरची,  हिरवी मिरची, फरसबी, कारली या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसत आहे. परिणामी एपीएमसीत उच्चतम दर्जाच्या भाज्या कमी असून त्याला जास्त मागणी आहे. तसेच सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने भाज्यांना मागणी आधीक आहे त्यामुळे भाज्यांच्या दरात १०-२०रुपयांनी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महापालिकेची स्वच्छता मोहीमेनंतर दैनंदिन कचरा रस्त्यावर

गेल्या काही दिवसांपासून  राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला उत्पादनाला बसत असून फळभाज्या त्याच बरोबर पालेभाज्यांच्या दरात  वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी संतोष नवले यांनी दिली आहे. पितृपक्ष पंधरावडा देखील सुरू झाला आहे. त्यामुळे भाज्यांना अधिक मागणी वाढली आहे. मात्र भाज्यांच्या दर वाढीने गृहिणींची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. एपीएमसीत सोमवारी ६८७ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये टोमॅटो,कोबी, काकडी, भेंडी, वांगी या भाज्यांचे दर स्थिर आहेत तर हिरवा वाटाणा, फ्लावर, गवार,  शिमला मिरची,  हिरवी मिरची, कारली , फरसबी या भाज्यांच्या दारांनी उसळी घेतली आहे. घाऊक बाजारात हिरवा वाटाणा  आधी १२०ते १३० रुपयांवरून आता १४०-१६० रुपयांवर तर गवार ४०-४५ रुवरून ६०-६५रुपयांवर , हिरवी मिरची ३३ ते ४० रुपयांवरून ४६ ते ४८ रु तर शिमला मिरची ४०ते ४५ रुपयांनी उपलब्ध असलेली  ६०रुपयांनी विकली जात आहे. तसेच आधी फ्लावर १५-२०रुपयांनी उपलब्ध होता तो आता २२-२४ रुपयांनी विकला जात तर कारली १८-२० रुपयांवरून  २२-२४ रुपयांनी आणि फरसबी ४०-४५रुवरून आता ६०-६५ रुपयांनीउपलब्ध आहे. तेच किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा १८०-२००रुपये किलो तर गवार, शिमला मिरची आणि फरसबी ८०रुपयांनी, कारली आणि फ्लॉवर ४०-५०रुपये तर हिरवी मिरची ६०-८०रुपये किलोने विक्री होत आहे.

घाऊक दर

भाजीपाला          आता           आधी

वाटाणा            १४०-१६०         १२०-१३०

गवार             ६०-६५          ४०-४५

कारली              २२-२४           १८-२०

हिरवी मिरची     ४६-४८          ३३-४०

शिमला           ६०             ४०-४५

फ्लॉवर         २२-२४           १५-२०

फरसबी         ६०-६५           ४५-५०

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable price increase by rs 10 to 20 in apmc market zws
Show comments