जगदीश तांडेल, लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावण सुरू झाला असून पावसाळ्यात डोंगर माथा, शेताचा बांध व घराच्या परसात लागवड करण्यात आलेल्या ताज्या स्थानिक भाज्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र या  भाज्या अगमनालाच कडाडल्या आहेत. त्यांचे दर किलो मागे ६० ते १०० रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रावण म्हणजे व्रतवैकल्ये, उपवास,सणांचा महिना. या महिन्यात पावसाच्या सुरुवातीला उरण व पेण मधील डोंगर माथ्यावर मशागत करून या भाज्यांची पिके घेतली जातात. तर दुसरीकडे अनेक शेतकरी आपल्याच शेताच्या बांधावर भेंडी,शिरले, झेंडूची फुले आदींची लागवड करतात. तसेच गावात आपापल्या मोकळ्या अंगणात किंवा परसात शिरले, काकडी,घोसाळी,दुधी भोपळे,पडवळ आदींचे पीक घेतले जाते. या भाज्या बहुतांशी सेंद्रिय व पारंपरिक पद्धतीने लागल्या जातात. त्यामुळे नेहमीच्या भाज्यापेक्षा या भाज्या रुचकर आणि चिष्ट आणि विशेष म्हणजे ताज्या असतात. त्यामुळे या काळात स्थानिक भाज्यांना अधिकची पसंती असते. सध्या उरणच्या बाजारात पेण आणि उरण मधील काही गावातील भाज्यांची विक्ती सुरू आहे. यात स्थानिक महिला व पेण तालुक्यातील आदिवासी कडून भाजीची विक्री केली जात आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : एपीएमसी बाजारात टॉमेटोच्या दरात घसरण; प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी उतरले

गणेशोत्सवात अधिक मागणी :

या भाज्यांची लागवड ही शेतकरी स्वतःच्या हाताने करीत असून त्यासाठी कोणत्याही पशूंची मदत घेतली जात नाही. त्यामुळे या भाजीला गणेशोत्सवाच्या काळात उपवासासाठी अधिकची मागणी असते.

भाजी लागवड घटल्याने दरवाढ :

रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास कामांच्या नावाने मोठ्या प्रमाणात डोंगर उध्वस्त केले आहेत. त्याचप्रमाणे शेती ही झपाट्याने नष्ट झाली आहे. तर गावात जमीनी कमी पडू लागल्याने गावातील अंगण आणि   परसाच्या जगात ही घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक भाज्यांच्या उत्पादनात कमी आली आहे. परिणामी मागणी पेक्षा आवक कमी होत असल्याने दरात वाढ झाली असल्याची माहिती भाजी विक्रेत्या सुनंदा कातकरी यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> उरण मध्ये पावसाचा पंधरा दिवस  खंड पडल्याने उरणच्या नागरिकांची पाणी चिंता वाढली

तर श्रावणातील उपवास सुरू झाले आहेत. त्यामुळे आमचं मूळ अन्न हे मासळी असली तरी या महिन्यात गणेशोत्सवा पर्यंत भाज्या खाल्ल्या जातात मात्र मागील अनेक महिने भाज्यांचे दर वाढले असून ज्यांना आम्ही गावठी भाज्या म्हणून पसंती देतो त्यांचेही दर वाढल्याने आता महिन्याचे संपूर्ण अर्थकारण बदलून गेल्याचे मत उरण मधील नागरिक विजय साठे यांनी व्यक्त केले आहे.

उरणच्या करंजात मोठी शिराळे व काकड्या प्रसिद्ध : उरण मधील मच्छिमारांच गाव म्हणुन प्रसिद्ध असलेल्या करंजा गावात मोठ्या प्रमाणात शिराळे व वेगवेगळ्या प्रकारच्या काकड्यांचे उत्पादन घेतले जाते. येथील शिराळे दोन ते अडीच फूट लांबीचे असतात. मात्र तरीही कोवळे व चविष्ट म्हणून त्यांना मागणी आहे. 

भाज्यांचे दर :

शिराळे – १०० रुपये किलो

कारली – १०० रुपये किलो

काकडी- ५० रुपये किलो

घोसाळी – ८० रुपये किलो

आळु – ५० रुपये जुडी भाजे – ७० रुपये जुडी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetable prices surge vegtable prices soar vegetable prices up zws
Show comments