नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून  शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात १०% ते १५% वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानात होणारे बदल त्यामुळे उत्पादन कमी झाले असून भाज्यांच्या दर्जावर ही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात आवक कमी होत असून  उच्चतम प्रतीच्या भाज्यांचे दर वधारले आहेत.

 एपीएमसीत मंगळवारी ५९४ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडीची आवक घटल्याने दर १०% ते १५% वाढले आहेत,अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.  मंगळवारी एपीएमसीत काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी  ३२३क्विंटल, वाटाणा १०४५क्विंटल, आवक झाली आहे.  टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची,हिरवा वाटाणा दर उतरले आहेत, तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट
Solapur Onion auction resumed on Monday after a four day work stoppage by Mathadi workers
चार दिवसांच्या खंडानंतर, सोलापुरात कांदा लिलाव
potato prices , prices vegetables pune,
आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट
nashik Angry farmers protested on Manmad Yewla Road halting auction due to falling onion prices
येवला बाजार समितीत शेतकऱ्यांकडून लिलाव बंद, मनमाड रस्त्यावर ठिय्या
Pomegranate loksatta news
फळबाजारात फडकतोय डाळींबाचा “भगवा”, आवक घटल्याने डाळींबाची चढ्या दराने विक्री
onion export duty issues, onion prices, farmers
विश्लेषण : शेतकरी निराश, ग्राहकही हताश… कांदा खरेदी-विक्रीत मग नक्की कोणाचा फायदा?

हेही वाचा >>> नवी मुंबई: हापूस आवक घटल्याने दरवाढ; प्रतिपेटी २०० ते ५०० रुपयांनी महागले

आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५रुपयांनी उपलब्ध होती त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२रु होती ती आता ३०-३२रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी १२-१४ रुपयांवरून १६-१८रुपये तर वांगी प्रतिकिलो १२रुपये होती आता १६ रुपयांनी विकली जात आहेत. एकंदरीत या भाज्यांची १०% ते १५% दरवाढ झाली आहे, तर हिरवी मिरची आणि मटारचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये होता ते आता ६० रुपयांवर उपलब्ध आहे तर हिरवी मिरची १६-२० रुपयांनी विक्री होत आहे.

अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेने भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला असून दर्जावर ही परिणाम झाला . त्यामुळे एपीएमसी बाजारात काही भाज्यांची आवक कमी होत असून  दरवाढ झाली आहे.

– नाना बोरकर,व्यापारी, एपीएमसी

भाजी दर (प्रतिकिलो)

                           आता                आधी

काकडी              १६-१८रु            १२-१४रु

शिमला मिरची     ३०-३२रु            २०-२२रु

फरसबी               ५०-५५रु           ४०-४५रु

वांगी                    १६रु              १२रु

हिरवी मिरची         १६-२०रु        २०-३०रु

वाटाणा                 ६०रु            ८०रु

Story img Loader