वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात मागील दोन आठवड्यापासून हिरवा वाटाणा बरोबरच इतर भाज्यांचे दर गडगडले होते . परंतु आज सोमवारी बाजारात आवक कमी झाल्याने पुन्हा भाज्यांच्या दरात १० टक्के दरवाढ झाली आहे. यामध्ये टोमॅटो, फरसबी, कोबी, फ्लॉवर, वांगी, हिरवी मिरची, भेंडी, कारली ,गवार यांच्या दरात वाढ झाली आहे.
यंदा गणेशोत्सवनंतर पितृपक्ष पंधरवड्यात तसेच नोव्हेंबर मध्ये भाज्यांच्या दराने उच्चांक गाठला होता. विशेषतः पालेभाज्यांच्या दरात भरघोस वाढ झाली होती. त्यानंतर मागील दोन आठवड्यापासून बाजारात आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले होते. हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू होताच प्रति किलो २०० रुपयांवर पोहोचलेले वाटाणे अवाक्यात आले होते. त्यामुळे इतर भाज्यांच्या दरातही घसरण झाली होती. परंतु आज सोमवारी बाजारात संक्रांत निमित्त भाज्यांची तोडणी झाली नसल्याने आवक कमी झाली आहे. एपीएमसी बाजारात सोमवारी ५६९ गाड्या दाखल झाले असून भाज्यांच्या दरात १० टक्के वाढ झाली आहे.
भाजी आधी आता
कोबी ४-५ ६-८
फ्लावर ६-७ १४-२०
वांगी ५-६ २०-३०
कारली १४-१६ २६-३०
हिरविमिरची १४-१६ ४०-५०
भेंडी १६-२० ४०-५२
गवार ३०-३२ ५०-७०
टोमॅटो ८-१० १४-१८
फरसबी २०-३० २५-४५