बाजारात ग्राहक कमी असल्याने उठाव कमी , भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबई वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात पावसामुळे  भाज्यांची आवक घटली असून, ग्राहक नसल्याने शेतमालाला उठाव नसून भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. नियमितपणे  ५०० ते ६००गाड्या दाखल होतात,परंतु सोमवारी बाजारात ४०० गाड्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा >>> कोपरखैरणेतील पालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीतील सीसीटीव्ही यंत्रणा निकामी; चोरीच्या घटनांनी नागरिक हवालदिल

राज्यात विविध जिल्ह्यांत सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बसरत असून काही ठिकाणी गारपीट होत आहे. त्यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. रविवारी बाजार बंद असल्याने दर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढते ६०० गाड्या दाखल होत असतात. परंतु सोमवारी बाजारात केवळ ४०० गाड्या दाखल झाल्या आहे. परंतु आवक कमी होऊन न दरात वाढ न होता भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी, रमजान यामुळे बाजारात ग्राहक रोडावले आहेत, त्यामुळे भाजीपाल्याला उठाव कमी असल्याने सोमवारी बाजारात ३०% शेतमाल शिल्लक राहिला आहे, अशी महिती एपीएमसी व्यापारी नाना बोरकर यांनी दिली आहे.

Story img Loader