पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत विमानतळावरुन पहिले विमानउड्डाण होण्यासाठी युद्धपातळीवर सिडको मंडळ व अदानी समुह दिवसरात्र काम करत आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकल्पाचे काम सूरु असलेल्या ठिकाणी धडाधड झालेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांनी स्फोटकाचे काम रोखून धरले.

ही बाब सिडको मंडळ व अदानी समुहाच्या अधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलीसांच्या ध्यानात आणून दिल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीसांनी संतापलेल्या ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर त्याच बैठकीत स्फोटांचे नियोजन आखून दिल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले. काही दिवसात शेवटचे ४०० स्फोट करायचे असल्याने दरदिवशी सकाळी २५ व सायंकाळी २५ असे ४०० सुरुंग स्फोट करण्याचे ठरल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

हेही वाचा…नवी मुंबई : भुयारी मार्गासाठी पुनर्वसन आराखडा, खारघर-तुर्भे भुयारी मार्गातील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण लवकरच

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत ओवळे गावातील काही ग्रामस्थांनी त्यांच्या हक्काचे भूखंड न मिळाल्याने त्यांनी घर रिकामी केले नसल्याने काही कुटूंबे अजूनही त्याचठिकाणी राहतात. ग्रामस्थांना मिळणारे भूखंड त्यांच्या सोयीनूसार भूखंड ताब्यात द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यामुळे काही ग्रामस्थांना प्रकल्पाच्या नुकसानी पोटी मिळणारे भूखंड अजूनही मिळू शकले नाही. त्यामुळे विमानतळ प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर सुरुंग स्फोटाचे हादरे बसल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : युवकाच्या मृतदेहाचा शोध सुरूच

ओवळे ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी विमानतळ गाभाक्षेत्राच्या बाहेर ओवळे गावच्या पाठीमागे विमानतळाच्या प्रशासकीय कार्यालय ज्याठिकाणी उभारले जाणार आहे त्या लहानटेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी स्फोट केले जात होते. ग्रामस्थांनी या स्फोटांना विरोध केल्यामुळे पोलीसांना हस्तक्षेप करावा लागला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने ओवळे गावात धाव घेऊन संतापलेल्या गावकरी व सिडको अधिकारी यांच्यात बैठक लावून हा प्रश्न संवादाने सोडविला. या बैठकीत दिवसाला पन्नास स्फोट करण्याचे ठरले. त्यामुळे पुढील काही दिवसात ओवळे गावामागील लहान टेकडी भूईसपाट केली जाणार आहे.