उरण : येथील द्रोणागिरी नोड मधील भेंडखळच्या केंद्रीय भांडरण विभाग(सी. डब्ल्यू. सी.) गोदामात १५ वर्षांपासून काम करणाऱ्या ५०२ स्थानिक भूमिपुत्र कामगारांना नोकरीत सामावून घ्या या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (३ मार्च ) ला येथील कामगार व भेंडखळ ग्रामस्थ हल्लाबोल करून गेट बंद आंदोलन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सीवूडस् येथील न्युरोजन हॉस्पिटलवरील परवाना रद्द करण्याच्या कारवाईनंतर उलटसुलट चर्चांना उधाण

स्थानिक भूमिपुत्रांना सी. डब्ल्यू. सी. गोदामात नोकरी नाकारली जात असल्याने सोमवार पासून कामगार व ग्रामस्थांनी टर्मिनलच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले आहे. या कामगारांना विविध संघटना आणि राजकीय पक्ष नेत्यांनी पाठींबा दिला आहे. भेंडखळ गावातील ग्रामपंचायत सदस्य व विविध राजकीय पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. पंधरा वर्षापपूर्वी  द्रोणागिरी नोड मधील भेंडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत हिंद टर्मिनल हे गोदाम उभारण्यात आले होते. या गोदामात भेंडखळ गावातील बेरोजगार तरुणांना स्थानिक भूमिपुत्र म्हणून १५ वर्षांपूर्वी नोकरी देण्यात आली होती. मात्र हिंद टर्मिनल आणि सी. डब्ल्यू. सी. यांच्यातील भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यामुळे या टर्मिनल मधील काम बंद झाले आहे. परिणामी भेंडखळ मधील स्थानिक कामगार बेरोजगार झाले आहेत. हे गोदाम सुरू करून बेरोजगारांना काम द्या या मागणीसाठी कामगारांनी २०१९ मध्ये आंदोलन केले होते. तर गोदाम सूरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे सी. डब्ल्यू.सी. ने निविदा काढली आहे. ही निविदा पोलारीस या कंपनीला मिळाल्याने त्यांनी गोदाम सुरू केले आहे. मात्र या कंपनी अनेक वर्षे काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार नकारत असल्याने कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. 

हेही वाचा >>> नवी मुंबई : बाजारात होळीची लगबग सुरू; नैसर्गिक रंगांनी बाजारपेठा फुलल्या

कामगार आणि ग्रामस्थांच म्हणणं आहे. त्यामुळे नव्या कंत्राटदाराने १५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना कामांवर घ्यावे या मागणीसाठी हे साखळी उपोषण सुरू केले आहे. या गोदामातील कामगारांचे नेतृत्व करीत असल्याने सी. डब्ल्यू. सी. ने पुन्हा  गोदाम सुरू करावे यासाठी आपण प्रयत्न सुरू असून मंगळवारी कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांची भेट घेतली असल्याची माहीती कामगारांचे नेते व जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉ.भूषण पाटील यांनी दिली आहे. मात्र गोदाम व्यवस्थापन कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याने शुक्रवार गेट बंद आंदोलन करणार असल्याची माहीती त्यांनी दिली. मंगळवारी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत,सामाजिक कार्यकर्ते एल.बी. पाटील ,संतोष पवार यांनीही पाठिंबा दिला.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers local workers protest for permanent job incentral warehousing department zws