पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडाधड झालेल्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांनी स्फोटांचे काम रोखून धरले. ही बाब सिडको मंडळ व अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांनी पनवेल शहर पोलिसांच्या ध्यानात आणून दिल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी संतापलेल्या ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात संवाद घडवून आणला. त्यानंतर त्याच बैठकीत स्फोटांचे नियोजन आखून दिल्याने काम पुन्हा सुरू करण्यात आले.

काही दिवसांत शेवटचे ४०० स्फोट करायचे असल्याने दररोज सकाळी २५ व सायंकाळी २५ असे ४०० सुरुंग स्फोट करण्याचे ठरल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत विमानतळावरून पहिले विमानउड्डाण होण्यासाठी सिडको मंडळ व अदानी समूह दिवसरात्र काम करत आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

आणखी वाचा-पाच वर्षात पनवेल महापालिकेचा पहिला प्रारुप विकास आराखडा तयार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत ओवळे गावातील काही ग्रामस्थांनी त्यांच्या हक्काचे भूखंड न मिळाल्याने त्यांनी घरे रिकामी केले नसल्याने काही कुटुंबे अजूनही त्याच ठिकाणी राहतात. ग्रामस्थांना मिळणारे भूखंड त्यांच्या सोयीनुसार ताब्यात द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. त्यामुळे काही ग्रामस्थांना प्रकल्पाच्या नुकसानीपोटी मिळणारे भूखंड अजूनही मिळू शकले नाहीत. त्यामुळे विमानतळ प्रकल्पापासून हाकेच्या अंतरावर सुरुंग स्फोटाचे हादरे बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ओवळे ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी विमानतळ गाभाक्षेत्राच्या बाहेर ओवळे गावच्या पाठीमागे विमानतळाच्या प्रशासकीय कार्यालय ज्या ठिकाणी उभारले जाणार आहे त्या लहान टेकडीचे सपाटीकरण करण्यासाठी स्फोट केले जात होते.

आणखी वाचा- नवी मुंबई : एमडी विकणाऱ्या दोघांना अटक, २४ लाखांचे एमडी जप्त

ग्रामस्थांनी या स्फोटांना विरोध केल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने ओवळे गावात धाव घेऊन संतापलेल्या गावकरी व सिडको अधिकारी यांच्यात बैठक लावून हा प्रश्न संवादाने सोडविला. या बैठकीत दिवसाला ५० स्फोट करण्याचे ठरले. त्यामुळे पुढील काही दिवसात ओवळे गावामागील लहान टेकडी भुईसपाट केली जाणार आहे.