नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील एपीएमसी मार्केट मध्ये ‘विजय’ आणि ‘विराज’ असे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जातीची कलिंगड दाखल झाले आहेत. या दोन जातींच्या कलिंगडाचा लॉंचिंग सोहळा एपीएमसी मध्ये पार पडला. हे कलिंगड चवीला गोड, रंगाने लालबुंद आणि आकाराने मोठे असणारे हे कलिंगड जास्त काळ टिकून राहणारे आहेत अशी माहिती व्यापारी महेश मुंढे यांनी दिली.नव्याने विकसित करण्यात आलेल्या या कलिंगडाच्या जाती अस्सल भारतीय वाण असून याचे वाण बारा महिने घेता येईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कलिंगड हे पिक घेताना  बहुतांश विदेशी वाणाचा उपयोग करून उत्पन्न घेतले जाते. कोल्ड स्टोअरेज  निर्माण झाल्या नंतर कलिंगड बाराही महिने मिळत होते. मात्र आता कोल्ड स्टोअरेजची गरज नसून बाराही महिने पिक घेता येईल असे वाण आरडोर सिडसचे विकास नलावडे यांनी  निर्माण केले आहे. यात विजय आणि विराट असे नाव या वाणांना देण्यात आले आहे. हीच उत्पादने सोमवारी पहिल्यांदाच एपीएमसी मध्ये दाखल झाले असून व्यापारी महेश मुंढे यांनी ते मागवली आहेत. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही या नव्या बीजाचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat and vijay new variety watermelon launching apmc market navi mumbai tmb 01